बायऽऽबाय हॉर्टअटॅक’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

रविवारी स्लाईडशोद्वारा डॉ.रतन राठोड मुंबई करणार मार्गदर्शन
कार्डिओलॉजीस्ट डॉ. रतन राठोड 


खामगाव :- सद्या धकाधकिच्या काळात हार्टअटॅक कधी व केव्हाही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तिला येवू शकतो याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा गंभीर आजाराला बायऽऽबाय करण्यासाठी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज् सेवा केंद्राच्यावतीने ११ फेब्रुवारी रोजी बायऽऽबाय हार्टअटॅक नि:शुल्क हृदयरोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्लाईडशोच्या माध्यमातून मुुंबई येथील हेड कार्डिओलॉजीस्ट डॉ. रतन राठोड कार्डिओलॉजीस्ट डॉ. रतन राठोड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


सदरचे मार्गदर्शन शिबिर कोल्हटकर स्मारक मंदिर येथे दुपारी ४ ते ६ या दरम्यान पार पडणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्र.कु. रूक्मणीदिदी अकोला, वाशिम जिल्हा सेवा केंद्र संचालिका राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती सतीष राठी खामगाव, यांच्या सह अध्यक्ष रोटरी क्लब खामगाव, अध्यक्ष लॉयन्स क्लब खामगाव, अध्यक्ष लॉयन्स क्लब सिल्व्हरसिटी खामगाव यांची राहणार आहे.
या मार्गदर्शन शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ब्र.कु. शकुंतलादिदी संचालिका सेवा केंद्र खामगाव यांनी केले आहे.


Post a Comment

أحدث أقدم