गायक महेंद्र सावंग उत्कृष्ट गायक  विशेष पुरस्काराने सन्मानित



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-  8 फेब्रुवारी,2024 ला मनसगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने गायक महेंद्र सावंग यांना *उत्कृष्ट गायक हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले* सदर पुरस्कार मा. राजेश जी राजोरे बुलढाणा आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती व मा. प्रसेंजितदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला महेंद्र सावंग हे खामगांव तालुक्यातील रोहणा या गावचे असून लहानपणापासून च गाण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आहे 



सम्पूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा या सारख्या राज्यात सुद्धा त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी मराठी चित्रपटात सुद्धा गाणी गायली आहे त्यांच्या या कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने पुरस्कार दिला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेनेजीत पाटील होते तर उदघाक म्हणुन दै देशोन्नती चे बुलढाणा आवृत्ती संपादक राजेश राजुरे होते सूत्रसंचालन भगत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्र समदूर ता अध्यक्ष यांनी केले कार्यक्रमाचे आयोजक देवेंद्र समदुर सागर शिरसाठ व सर्व पत्रकार संघ शेगाव हे होते सदर पुरस्कार मिळाल्या मुळे गायक महेंद्र सावंग यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

أحدث أقدم