अंजुमन हायस्कूल अतिशय प्रभावी आणि एक अनुकरणीय शाळा आहे... सांसद फौजिया खान

 सरकारने या ब्रिटिशकालीन शाळा कडे लक्ष द्यावे

 खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क - आज मी खामगाव येथील अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला  भेट दिली.ब्रिटिश काळातील ही संस्था 100 वर्ष जुनी आहे.या संस्थेच्या प्रयोगशाळेतील संपूर्ण पायाभूत सुविधा पाहण्याची संधी मिळाली.संपूर्ण कामकाज पाहून मी खूप प्रभावित झालो. या संस्थेने , प्रभावशाली आणि एक अनुकरणीय शाळा उभी केली आहे, इथे विद्यार्थ्यांना अशा सुविधा मिळत आहेत ज्या महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी उपलब्ध नसतील. येथे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर सर्व सुविधा मिळत आहेत, ज्याचा विद्यार्थी पुरेपूर फायदा घेत आहेत.व्यवस्थापन खूप चांगले आहे ही आनंदाची बाब आहे, ही एक उत्तम उदाहरण शाळा आहे, निजामकालीन या शाळेला शासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, हे मला कळले आहे. आणि हा या शाळेवर अन्याय आहे , सरकारने या संस्थेकडे बघावे, एवढेच नाही तर त्यांना मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे होता

 पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आजच्या काळात खान मोहम्मद अजहर हुसैन साहब यांनी जी जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.त्याला मोठी चळवळ साधायला हवा शिक्षणाशिवाय इलाज नाही. म्हणून आपण निष्काळजी राहू नयेअजहर हुसेन साहब यांच्या कुटुंबाबद्दल मी तुम्हाला सांगतो की त्यांनी आपले परिवाराला खूप चांगले संस्कार दिले आहे त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगा डॉक्टर आहे. डॉ. जिशान नेहमी गरीबांना मदत करतो. त्यांची एक मुलगी जी आमच्या कुटुंबात जोडली गेली आहे. माझ्या  भावाची पत्नी आहे आणि ति आमच्या कुटुंबातील एक अनुकरणीय सून आहे. अजहर खान साहेब यांनी आपल्या कुटुंबाला उत्कृष्ट संस्कार दिले आहे. ती आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. ती एक अनुकरणीय सून आहे. ज्याचा मलाही अभिमान आहे आणि आज मी स्टेजवर हे सांगत आहे.28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता स्थानिक अंजुमन हायस्कूल च्या हॉलमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा जिल्ह्यातील 49 शाळांमधील 8141 विद्यार्थ्याना पारितोषिके  वितरित करण्यात आली

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेरार तालीमी कारवां चे अध्यक्ष व माजी मंत्री प्रा खान मोहम्मद अजहर हुसैन तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य खासदार फौजिया तहसीन खान , तहसीन खान , माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा, अंजुमन मुफिदुल  इस्लाम संस्था अध्यक्ष डॉ  वकार  उल हक खान , राष्ट्रवादी कार्याध्यक्ष बुलढाणा देवेंद्र देशमुख , मुफ्ती अशफाक अहमद, सैय्यद इस्हाक राही , सरफराज नवाज खान ,गनी गाजी , अबरार  उल हक फारकी , मोहम्मद तौसीफ सेठ , अब्दुल रशीद जमादार , अताऊल्लाह खान पठाण , एड वसीम कुरैशी , डॉ याकूब , जाकीर सर , मंचावर विराजमान होते तिलावते कुरान पाक ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचे पुष्प बुके देऊन स्वागत करण्यात आलेडॉ वकार उल हक खान यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडलेदेवेंद्र देशमुख यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की या संस्थेचा नोंद गैझेटियर असून मी सुद्धा पाहिले महात्मा गांधीजी यांना चळवळीत संस्थेच्या वतीने 1933 साली चांदीच्या शिक्के ची पिशवी देण्यात आली होती 

आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार राणा दिलीप कुमार  सानंदा यांनी सांगितले की संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष नगरपालिका जिया उल हक्क खान साहेब यांच्या सोबत मला नगरपरिषदेत 10 काम करण्याची संधी मिळाली व सदैव मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांनी मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी  अथक परिश्रम घेतले व त्यानी अंजुमन चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात रोशन केले 

दरम्यान मो अबरार उल हक फारुकी यांनी इयत्ता 1ली ते इयत्ता 12 पर्यंत चे विज्ञान आणि गणित विषयातील तयार केलेली डिक्शनरी चे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले 

त्यानंतर स्पर्धा परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शाळानिहाय पुरस्कार वितरण करण्यात आले

 कार्यक्रमाच्या पूर्वी फौजिया खान , मोहम्मद अजहर हुसैन , व इतर मान्यवरांनी शाळा परिसरातील सर्व विभागाची बारकाईने पाहणी केली व समाधान व्यक्त करून कौतुक केले

कार्यक्रमाचे संचालन अनस नबिल यांनी तर आभार प्रदर्शन गनी गाजी यांनी केले

Post a Comment

أحدث أقدم