सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस मध्ये राज्यस्तरीय प्रोजेक्ट प्रदर्शनीला भव्य प्रतीसाद

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांव व्दारा संचालीत सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव  येथे राज्यस्तरीय  इंडियन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्युकेशन न्यु दिल्ली मान्यता प्राप्त प्रोजेक्ट पदर्शनीचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी  करण्यात आले होते.  या कार्यक्रमांचे उद्घाटन आणि व्दिप प्रज्वलन शासकीय तंत्रनिकेतन खामगांचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन तसेच प्रा. सी. एम. मानकर श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव, प्रा. ए. पी. कंकाळे, प्रा. ए. एम. भोपळे, प्रा. कुलभुषण शेजोळे मानव स्कुल ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी, अकोला, प्रा. समिर कुळकर्णी शासकीय तंत्रनिकेतन खामगांव, सिध्दिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगांव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या प्राचार्या प्रिती अ. चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. 

या राज्यस्तरीय प्रकल्प पदर्शनीमध्ये राज्यातील विविध जिल्हयातील नागपुर, यवतमाळ, जळगांव खान्देश, वाशिम, बुलडाणा इत्यादी जिल्हयामधून अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व विज्ञान महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला यामध्ये 150 पेक्षा जास्त प्रोजेक्ट पदर्शनानी उपस्थिताचे लक्ष वेधले. यामध्ये वाहन चालक निर्देशक प्रणाली, शेतकऱ्याकरीता विद्युतची बचत, व्यावसायिका करीता नविन डिजीटल प्रणाली, महिलाकरीता घरकाम करण्यात करीता सोईस्कर प्रणाली, बांधकाम संबंधी प्रणाली, वैद्यकीय आधुनिक प्रणालीवर प्रोजेक्ट मांडण्याल आले होते. तसेच पोस्टर प्रदर्शनीमध्ये ए आय एम एल, 5जी, डिजीटल इंडिया, सायबर सिक्युरिटी, थर्मल पॉवर प्लंन्ट, इंडस्ट्री 4.0 असे विभिन्न विषयासंबंधी चित्रातुन प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता बाहेरुन आलेले प्रा. सी. एम. मानकर, प्रा. ए. पी. कंकाळे, प्रा. ए. एम. भोपळे, प्रा. कुलभुषण शेजोळे यांची परीक्षक म्हणून लाभले होते. 




या कार्यक्रमामधुन दोन विजेता आणि दोन उपविजेता स्पर्धक यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या विजेता आणि उपविजेता स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष मा. सागरभाऊ फुंडकर यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. विजेता मधुन संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव येथील स्मार्ट ब्रिथ, ॲडव्हॉस हेल्थकेअर, थ्रु इनोव्हेटयु, स्मार्ट व्हेन्टीलेटर सोलुशन या प्रोजेक्ट करीता ऋतिक कुशवाह, रिध्दी पाटील, साक्षी सोनी, निलव मंडाल या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी गटातुन प्रथम पारितोषिक रुपये 10000/- प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच व्दितीय पारितोषिक सिध्दिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव येथील कॉन स्टार्च कॉक्रीट या प्रोजेक्ट करीता मोहम्मद शेख, सय्यद रेहान, अग्रजा बायस्कर, नेहा शेजाव या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी गटातून व्दितीय पारितोषिक रुपये 5000/- प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आले. तसेच तंत्रनिकेतन मधुन शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथील ड्रॉयव्हर ड्रॉवसिनेस, डिटेक्शेन सिस्टीम या प्रोजेक्ट करीता सनी चव्हाण, ओम डबाले, हर्षल घोरपडे, मोहित राठी तंत्रनिकेतन गटामधून प्रथम पारितोषिक रुपये 10000/- प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आले.  



तसेच व्दितीय पारितोषिक सिध्दिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव येथील प्रिव्हीयस कॉक्रीट रोड करीता सुरज माळी, ऋतिक मुंडे, वैभव वाघ या विद्यार्थ्यांना रुपये 5000/- प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आले. तसेच विज्ञान महाविद्यालयामधून आदर्श विद्यालय, निपाणा येथील सेक्युरिटी फॉर द फार्म ॲन्ड एग्रीकल्चर या प्राजेक्ट करीता कु. साक्षी मोरखडे व कु. रिना इंगळे यांना पारितोषिक रुपये 5000/- प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आले. 



सदर प्रोजेक्ट प्रदर्शनाकरीता खामगांव परिसरातील औद्योगिक समुहातील श्री. प्रमोद अग्रवाल, श्री. सुरेश पारीक, श्री. जगदीश तिवारी, श्री. संजय पुरोहित इत्यादी मान्यवरानी उपिस्थिती दर्शवुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. बक्षिस वितरण दरम्यान महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. सागरभाऊ फुंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांकरीता कार्यक्रम समन्वयक प्रा. श्रध्दा कडुकार, प्रा. श्रध्दा रत्नपारखी तसेच विद्यार्थी समन्वयक कु. मिरा जुनारे, एैफाज मोहम्मद, पवन बोरचाटे, कु. अर्पिता बयस यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरीता विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरीता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुध्दा सहकार्य लाभले. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन प्रा. श्रीकृष्ण बोंबटकार यांनी केले. अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री . सागरभाऊ फुंडकर व संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार ॲड. मा.आकाशदादा फुंडकर यांनी शुभेच्छा दिल्या.





Post a Comment

أحدث أقدم