आ आकाश दादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस मध्ये रक्तदान शिबिर



वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांव व्दारा संचालीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव येथे दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी संस्थेचे उपाध्यक्ष तथा खामगांव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन मा. अॅड. आमदार आकाशदादा फुंडकर यांनी केले. सदर रक्तदान शिबिराकरीता संस्थेचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रिती अ. चोपडे तसेच जिल्हा उपसामान्य रुग्णालय, खामगांव येथील डॉ. राजश्री पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली देशमुख, रक्तपेढी प्रमुख व टिम यांची प्रमख उपस्थिती होती.



रक्तदान शिबीर कार्यक्रमांकरीता प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले संस्थेचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर यांनी रक्तदान आणि रक्तदानाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी यांनी रक्तदान बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. या रक्तदान शिबीरामध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.या रक्तदान शिबीराकरीता अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अतुल अढाव महिला अधिकारी प्रा. रधिका बिहाडे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. त्रिशुल भारसाकळे तथा महिला अधिकारी प्रा. भारती करांगळे तसेच प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर, क्रिडा शिक्षक यांचे कार्यक्रम यशस्वीतेकरीता मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन प्रा. पल्लवी सातव यांनी केले तर कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन प्रा. सुधिर हेलोडे यांनी केले. रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वीतेकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सागर फुंडकर व संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. मा. आमदार आकाशदादा फुंडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم