परमपूज्य श्री संत लक्ष्मणगिरी महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन रौप्य महोत्सव

मांडका येथे संगीत भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताह



खामगाव जनोपचार न्यूज- तालुक्यातील मांडका येथे परमपूज्य संत श्री लक्ष्मण गिरी महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन व रौप्य महोत्सवानिमित्त उद्या दिनांक 7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये भागवताचार्य हरिभक्त परायण अनिल महाराज तुपे, विनोदाचार्य ह भ प पद्माकर महाराज देशमुख, भागवताचार्य ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह भ प मनोहर महाराज सायखेडे, ह भ प अशोक महाराज ईदगे, ह भ प गोविंद महाराज गोरे ,स्वामी हरि चैतन्य आनंद सरस्वती जी महाराज, ह भ प रामदास महाराज किल्लारी यांचे कीर्तन होणार आहे= सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार असून समस्त गावकरी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्ष्मण गिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र मांडका यांच्यावतीने करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم