वाघाची शिकार करून दात काढल्याचे वक्त्तव्य आ. गायकवाड पडले महागात..  तो दात जप्त ....डीएनए चाचणी होणार!



बुलडाणा- आमदार संजय गायकवाड यांनी वाघाची शिकार करून दात काढुन गळ्यात परिधान केल्याचे वक्तव्य चांगलेच अंगलट आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान वनविभागाने आमदार गायकवाड यांचे बयाण नोंदविले असून जप्त केलेला गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. शिवजयंती दिवशी मी वाघाची शिकार केली असं म्हणत गळ्यातील दात हा वाघाचा असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. दरम्यान वनविभागाने आमदार गायकवाड यांचे बयाण नोंदविले असून जप्त केलेला गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या तपासात वाघाचाच दात असल्याचं निष्पण झालं तर गायकवाड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंती दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे बयाण नोंदविले आहे. शिवाय आमदारांच्या गळ्यातील ती दात सदृश्य वस्तू सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केलेय. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाघदात सदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून, डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा वन विभागाने दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم