संत रविदास महाराजाचे विचार समाजाला दिशा देणारे _ माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
चांदमारी भागात संत रविदास महाराज जयंतीनिमित्त चर्मकार समाज बांध्ावांच्या वतीने विविध्ा विध्ाायक कार्यक्रम संपन्न
खामगाव ः- संत रविदास महाराज हे अत्यंत दयाळू आणि दानवीर होते.संत रविदास महाराजांनी समाजामध्ये असलेली अंधश्रध्दा,जुनाट रुढी व पारंपारीक विचार या विरोधात क्रांतीकारक आवाज उठवुन सर्व समाजाला समानतेची वागणूक कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले व विषमतावादी समाजव्यवस्था बदलण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घ्ाातले.ध्ार्म आणि देशप्रेमाबाबतही संत रविदास महाराजांनी अतिशय रोखठोक विचार प्रकट केले.कुणालाही हिन भावनेने पाहु नका.मन शुध्द असेल तर कुठेही समाधान लाभते असा उपदेश ते नेहमी करीत असत,संत रविदास महाराज हे समाजाला दिशा देणारे महान संत होते असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त चांदमारी भागात विविध्ा विध्ाायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला चर्मकार समाजाचे युवा जिल्हाअध्यक्ष प्रितमभाऊ माळवंदे,माजी न.प.काँग्रेस गटनेता राणा अमेयकुमार सानंदा,माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, माजी नगरसेविका सौ.शितलताई माळवंदे, हरिभाउ गायकवाड, पवन माळवंदे,श्याम माळवंदे,ॲड.दिपक माळवंदे, नारायण गायकवाड,सुध्ााकर माने, सतीश गवळी,विजयअण्णा माळवंदे,विश्वहिंदु परिषदेचे राजाभाऊ राजपुत,ॲड.तरुण मोहता,शरद पुरोहित, निलेशसिंह ठाकुर आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम चांदमारी भागातील संत रविदास महाराज मंदिरामध्ये जयंतीनिमित्त चर्मकार समाज बांध्ावांच्या वतीने सकाळी 7 वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी 9 वाजता संत रविदास महाराज मंदिरामध्ये आरती होवुन मंदिरापासुन चांदमारी चौकापर्यंत टाळ,मृदुंगाच्या गजरात महिला भजनी मंडळाच्या वतीने संत रविदास महाराजांच्या नामाचा जय जयकार करीत दिंडी काढण्यात आली. दिंडी मार्गावर परिसरातील नागरीकांनी सडासमार्जन, रांगोळी काढुन ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत केले.
जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी न.प.काँग्रेस पक्षनेता राणा अमेयकुमार सानंदा,यांनी मंदिरामध्ये जावुन संत रविदास महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार घ्ाालुन पुजन करुन दर्शन घ्ोतले व संत रविदास महाराज जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.संत रविदास महाराज की जयच्या घ्ाोष्ाणेने परिसर दुमदुमुन गेला होता. या कार्यक्रमाला योगेश माळवंदे, शिवाजी झरेकर,आशिष कांबळे, सुरज लोंढे,पवन माळवंदे, राम माळवंदे,अनिकेत गुजर, आशिष घुमरे, श्याम माळवंदे, ऋषीकेश तासतोडे, गजानन हरणे, दत्ता केकाण, बळीराम माळवंदे, सोनु काकडे, अजय माळवंदे, रवि चौधरी, निखील देशमुख,दिनेश बोराडे, सोजरबाई गायकवाड, पद्माबाई रामोसे, सुमनबाई खरात,जिजाबाई मस्के, चंदाबाई चौधरी, छाया मस्के,अक्का माळवंदे, नंदाबाई माळवंदेे यांच्यासह चर्मकार समाज-बांध्ाव भगिणी व प्रभाग क्रं.7 मध्ाील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق