महिलांना सशक्त व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे खरं काम मोदीजींनी केलं-- चित्राताई वाघ
हजारो महिलांच्या उपस्थितीत नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न
*खामगाव*:: देशातील महिलांना सशक्त व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा खरं काम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा खामगाव मतदार संघाच्या वतीने स्थानिक लोकमान्य टिळक नगरपालिका शाळा क्रमांक ६ च्या मैदानावर काल २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नारीशक्ती सन्मान सोहळा व शक्तिवंदन महिला बचत गट तसेच महिला एनजीओ कार्यशाळा हा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांचे सह श्रीमती सुनिताआई फुंडकर,खामगाव मतदार संघाचे लाडके आ अँड आकाश फुंडकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सौ शुभदाताई नायक, रश्मीताई जाधव , रुबीना ताईपटेल , माजी जी प अध्यक्ष उमाताई तायडे, प्रदेश सदस्य सौ अनिता देशपांडे ,महिला मोर्चा खामगाव जिल्हाध्यक्ष सौ सारिकाताई डागा, भाजपा खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खामगाव मतदार संघातील उपस्थित महिला बचत गट व महिला एनजीओ यांच्याशी चित्राताई वाघ यांनी मुक्तपणे संवाद साधला. बोलताना त्या पुढे म्हणाले की बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करत त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास देण्याचा काम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे व करत आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आज देशातील एक कोटी बचत गटांसह अकरा कोटी महिलांना अधिक कार्यशील बनविण्याच्या दृष्टीने या शक्तिवंदन कार्यक्रमाने वेग धरला आहे. एनजीओ यांच्या सहकाऱ्यांनी नवनवीन योजनांशी जोडण्याचा व त्यातून बचत गटातील महिलांच्या हाताला काम देण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. मुद्रा योजना जनधन योजना लखपती दीदी ड्रोन अशा विविध माध्यमातून अद्यावत शेती कामांमध्येही महिलांना सामील करून मोठे काम करण्याचे यातून केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील 50 टक्के महिलांचा विचार करून त्यांच्यासाठी बचत गट सीआरपी या माध्यमातून दहा ते वीस लाखापर्यंत चे सोनेरी योजना सुरू केली आहे. देशातील सुमारे चार कोटी महिलांना त्यांचे नावावर घरकुल दिले आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण आणि अल्पवयीन असो वा इतर महिलांना कोणी अत्याचार केला तर त्यांच्यासाठी कायदा करत आरोपीला थेट फाशीची शिक्षा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा हक्क दिला त्यानंतर महिलांना खरंच सशक्त व पायावर उभे राहण्याचे काम त्यांना केंद्रस्थानी ठेवून मोदींनी केलं आणि अजूनही मोठ्या प्रमाणात महिलांसाठी ते विविध योजना राबवीत आहेत. आता मोदींच्या मार्फत वय वर्ष 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे. विशेष अशा लसमुळे त्या मुलींना भविष्यात गर्भाशयाचा कॅन्सर होणार नाही अशी विशेष काळजी मोदीजींनी घेतली आहे. उमेद निधी पंधरा वरून तीस हजार केला राज्यातील महिलांना एसटी बस मध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली केंद्र असो वा राज्य सरकार हे महिलांसाठी विशेष कार्य करत आहेत देशाच्या हितासाठी मोदीच यांची गॅरंटी आहे असे प्रतिपादन महिला बचत गट व एनजीओ यांच्याशी बोलताना सौ चित्राताई वाघ यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपा महिला मोर्चा खामगाव व शेगाव तालुका तसेच खामगाव शहर महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले.
*स्वतःसह देशाची प्रगती करणाऱ्या तुमच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम-- आ अँड फुंडकर*
महिलांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे हे पाहून देशाचे यशस्वी पंतप्रधान यांनी पंतप्रधानाची सूत्रे हातात घेतात महिलांना मोठ्या प्रमाणात सक्षम करायच्या दृष्टीने कामे करण्यास सुरुवात केली. आणखीही नवीन योजना त्यांनी घोषित केल्या व आणखीही त्यांच्या मनात महिलांसाठी खूप काही योजना राबविण्याचे आहे. देशातील महिलांना खरंच सक्षम करण्याचं काम मोदीजींनी केला आहे. देशाच्या प्रगती त महिलांचाही मोठा वाटा असावा या दृष्टिकोनातून त्यांनी महिलांना अधिकाधिक सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कामे केली. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी असो वा त्यांच्या रक्षणासाठी असे अनेक निर्णय मोदीजींनी घेतले. आज मोठ्या प्रमाणात लघु उद्योगासाठी सहज कर्ज महिला बचत गट व एनजीओंना देण्यात येते. यातून महिला स्वतः सक्षम तर होतच आहे आणि त्या माध्यमातून देशाच्या प्रगतीतही त्यांचा मोठा वाटा निर्माण होत आहे. आपण सर्व खूप मेहनत घेऊन आपले स्वतःचे स्थान ओळख निर्माण करीत आहात, त्यामुळे आपला खरा सन्मान व्हावा व मला वाढदिवसानिमित्त आपल्या आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठीच हा नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित केला असे यावेळी आ अँड आकाश फुंडकर महिलांशी संवाद साधताना बोलले.
إرسال تعليق