संविधान शिवाय देशाला तरणोपाय नाही... विशाखाताई सावंग
संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले संविधानच देशाला तारणार आहे. किंबहुना आजमीतिला देशामध्ये संविधान विरोधी वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान सन्मान चळवळ उभी करून संविधानाचे महत्त्व व संरक्षण अधोरेखित केले. त्याच धर्तीवर विशाखाताई सावंग यांनीसंविधानाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.निमित्त होते वंचित बहुजन महिला आघाडीच्या ग्राम शाखेच्या उद्घाटनाचे. नुकतेच त्यांच्या हस्ते ग्राम शाखा लाखनवाडा बु.येथे वंचित बहुजन महिला आघाडीची शाखा निर्माण करण्यात आली.
त्याप्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की सविधान वाचलं तर देश वाचेल. त्यासाठी सर्वांनी संविधान रक्षणाची जबाबदारी पेलावी. इथल्या मनुवाद्यांनी संविधान संपविण्याचा घाट रसला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वांनी संविधान रक्षणासाठी पुढाकार घ्यावा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी संविधानाची निर्मिती केलेली आहे. ते वाचवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
गावागावात सतत फिरून, महिलांना एकत्र जोडून वंचित बहुजन महिला आघाडीचा वटवृक्ष कसा तयार होईल याचाच ध्यास विशाखाताई सावंग यांनी घेतलेला दिसून येतो. त्यासाठी घरादाराची परवा न करता आपल्याला मिळालेली अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे व खंबीर राहुन पार पाडण्यासाठी त्यांनी विडा उचललेला दिसून येतो. नित्य क्रमाने सामाजिक धार्मिक व राजकीय कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलेले दिसते. म्हणूनच पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन महिला आघाडीची तालुका जिल्हा व ग्रामशाखा यांची सक्रिय कार्यकारणी कार्यरत असताना दिसून येते. ग्राम शाखा स्थापन करण्यासाठी रविताताई वाकोडे यांनी प्रचंड मेहनत घेतली ग्रामशाखा उद्घाटन प्रसंगी रवींद्र गुरव, विलास वाकोडे प्रामुख्याने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनगायक, भीमशाहीर महेंद्र सावंग प्रामुख्याने उपस्थित होते.
![]() |
Advt. |
याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीग्राम शाखा लाखनवाडा अध्यक्ष छायाताई वानखडे, उपाध्यक्ष सुवर्णाबाई इंगळे, सचिव प्रतिभाबाई बावस्कार, सहसचिव मीराबाई वाघमारे, महासचिव मंदाबाई वानखडे, कोषाध्यक्ष सुकन्या सरदार, सल्लागार सुमनबाई वाकोडे, संघटक शिलाबाई वाकोडे, सदस्य गोदावरी बाई तायडे, राजकन्याबाई वानखडे, मायावतीबाई इंगळे, दिपाली वानखडे, आशाबाई वानखडे, सुनीता इंगळे ,निर्गुणाबाई वाकोडे ,वनमाला इंगळे, सखुबाई वाकोडे, रोहिणी इंगळे, राजकन्या पातोडे ,पार्वताबाई वानखडे ,वनिता इंगळे, सविता वाकोडे ,संगीता सुरवाडे ,संगीता इंगळे, ताईबाई इंगळे ,स्वाती सरदार इत्यादी सह असंख्य महिला उपस्थित होत्या.
![]() |
Advt. |
إرسال تعليق