खामगांव ते जालना मंजूर झालेल्या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपल्या हिश्याचा 50% निधी उपलब्ध करून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरु करावा या मागणी साठी आज विधान भवन मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिले.

यावेळी आमदार डॉ.संजयजी कुटे, खासदार प्रतापरावजी जाधव, आमदार संजयजी रायमूलकर आदि मान्यवर उपस्थित होते. 

खामगाव जालना या रेल्वे मार्गावरील खामगांव, शेगांव, चिखली, जालना या महत्वाच्या शहरातील रेल्वे आंदोलन समिती व सर्वसामान्य नागरीकांनी देखील वेळोवेळी आंदोलने केली आहे.

खामगांव जालना रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी जनभावना तिव्र असून या रेल्वे मार्गासाठी निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी रेल्वे लोक आंदोलन समिती चिखली" यांच्याव्दारे मागील ५० दिवसापासून साखळी आंदोलन सुरु आहे.

तरी शासनाने ५०% राज्यहिस्सा भरून लवकरच या रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे याबाबत विनंती केली असता मा देवेंद्रजींनि सकारात्मक प्रतिसाद देत मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल असे अश्वासित केले.



Post a Comment

أحدث أقدم