लक्ष्मीनारायण ग्रुप तर्फे स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

दि:-23 फेब्रुवारी २०२४ रोजी लक्ष्मीनारायण गृप तर्फे आज कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करण्यात  आले. सर्व प्रथम दिपप्रज्वलन व संत गाडगे बाबाच्या प्रतिमेला हारार्पन करण्यात आले.  


            खर्‍या अर्थाने तत्कालीन अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्यावर साध्या सोप्या भाषेमध्ये कीर्तनाच्या गजराद्वारे ज्यांनी समाज प्रबोधन केले .गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असे म्हणत समाजा मध्ये प्रगतीची कास धरायला लावणारे आणि सर्वांना शिक्षणाची महती सागणारे अनिष्ट प्रथा परंपरा कुरीती यांचा बीमोड करून जागृती निर्माण करून सत्याची कास धरा हा अट्टहास जनमाणसामधे पोहचविणारे असे संत गाडगे बाबा यांना या वेळी विनम्र पूर्वक अभिवादन करण्यात आले .

             आजच्या ही काळात संत गाडगेबाबांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. याची प्रचीती प्रतिदिन आपल्याला येत आहे. अनिष्ठ रूढीप्रथापरंपरा यांना दुर सारून शिक्षणाप्रति समनिष्ठा आणि गरजवंताना मदत करणेदिन दुबळयाची सेवाभुकेल्यांना अन्नतहानल्याना पाणी अर्थात काय तर अन्नवस्त्रनिवारा ह्या प्रमुख गरजा सर्वाना उपलब्ध व्हाव्यात हा मानस संत गाडगेबाबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अंगिकारला आणि आजूबाजूच्या परिसरातील घाण साफ करीत असताना तत्कालीन परिस्थितीत समाजामध्ये लोकांच्या मना मनातील वाईट आणि अनिष्ठ विचारांची घाण साफ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशा उच्च विचारांची गरज आजही आहे.

     जन सामान्या मध्ये स्व्छेतेची जागरूकता आणून त्यामुळे आपले आरोग्य आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण उत्कृष्ट वातावरनाची निर्मिती करू शकतो. खऱ्या अर्थाने आपले संपूर्ण जीवन ज्यांनी दिन दुबळयासाठी मोलाचे योगदान देत सर्वदूर शिक्षणाचा स्वच्छतेचा प्रचार प्रसार करणारे अग्रदूत म्हणून ज्यांचा नाव लौकिक आहे. अशा निष्काम कर्मयोगी संत  गाडगे बाबांना  कोटी कोटी वंदन करीत त्यांनी दाखविलेल्या मार्गांचा अवलंब सर्वांनी करावा ही काळाची गरज आहे

            कार्यक्रमाला कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चे प्राचार्य राहुल अग्रवाल मॉडेल स्कूलचे मुख्यध्यापक सुदाम  जाधव, प्रा. पुष्पा जावरे, प्रा. वैशाली पुदागे, प्रा. वैशाली ममतकार, प्रा. पूजा नावंदर, प्रा. श्रद्धा गोलाइत, स्व. मीनाताई जाधव औ.प्र.संस्थेतील निदेशक प्रा. आकाश खंडेराव, प्रा. अजय घाटे, प्रा. पूजा अत्तरकर, लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ़ फार्मसी चे प्राचार्य विशाल पडघान, प्रा. अश्विनी पटमासे, प्रा.राजनंदिनी सुरोशे, प्रा. शुभम सरोदे, सुलोचना गणोरकर, खुशाली जोशी, शोभा पवार, वंदना जाधव, स्वप्निल शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم