श्री सद्गगुरु जिजामाता भजनी मंडळाकडून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव भजनातून साजरा
खामगाव (प्रतिनिधी) स्थानिक बाळापुर फईल भागातील श्री सद्गुरु जिजामाता भजनी मंडळाकडून राजमाता जिजाऊ साहेब यांचा जन्मोत्सव भजनातून भजनातून साजरा करण्यात आला. काल 12 जानेवारी रोजी मंडळाचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या निवासस्थानी भजन गीत गाऊन आदरांजली वाहण्यात आली. मंडळांनी राजमातेचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भजनांनी गजर करून राष्ट्र भावना जागृत केली. यावेळी संभाजी शिंदे , विठ्ठल मिसाळ, किशोर बुट्टे, बाळकृष्ण वांडे, श्रीकृष्ण बेलूरकर, पराग दुबे, विलास पवार, भगवान डोके, रामराव देशमुख, जय पवार, हरीश पवार, अंशू पवार, विठ्ठल पुरी, आदींनी भजन गायन केले.
إرسال تعليق