युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये बालिका सप्ताह अंतर्गत "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" जयंती उत्साहात साजरी


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये सध्या बालिका सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करण्याऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी युगधर्म पब्लिक स्कूलचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल, शाळेचे सचिव श्री मधुरजी अग्रवाल तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप सपकाळ हे उपस्थित होते.


शाळेचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला "शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार" या घोषवाक्यानी सुरुवात करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या अ‌द्वितीय कार्याला उजाळा दिला. तसेच विशेषकरून आजच्या काळातील स्त्रीशिक्षणाचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या प्रसंगी शाळेमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, की ज्यात संचिता देशमुख, लक्ष्मी राऊत, दिव्या तिवारी, श्रीशा बडगे, आईश्नी जोशी या विद्यार्थ्यांनीनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केली. तसेच शाळेची शिक्षिका सुरेखा किलोलिया यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली, सोबतच गार्गी चव्हाण, उम्मेकुलसूम यमानौ, यादवी जोशी या विद्यार्थीनीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री संदीप सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर्णा डोंगरदिवे, स्वाती मोरे, पायल घड्डर्डीकर, सुरेखा किलोलिया, विजया आखरे, सचिन राठोड व इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी अनुष्का भिसे आणि स्नेहा टिकार यांनी केले. सरतेशेवटी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जयघोष करत आजच्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم