रोटरी क्लब खामगांव द्वारे रोटरी मॅराथॉन सिजन-६ संपन्न
खामगांव आणि परिसरातील जनतेच्या मनात आरोग्याविषयी चेतना निर्माण व्हावी म्हणून रोटरी क्लब ऑफ खामगांव दरवर्षी भव्य प्रमाणावर रोटरी मॅराथॉनचे आयोजन करीत असते आणि जनतेकडून त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो. स्थानिक जनतेला संधी देण्यासाठी यावेळेस स्पर्धा फक्त ३, ५ आणि १० किलोमीटर्सपुरतीच सीमित ठेवण्यात आली होती व त्यामुळेच यावर्षी या मॅरेथॉनमध्ये शहर आणि परिसरातील ८२० प्रतिस्पर्ध्यांनी यात भाग घेतला. यावर्षी सदर स्पर्धा स्थानिक सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रायोजकत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६ ते ८ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटांसाठी ३ किलोमीटर, ५ किलोमीटर व १० किलोमीटर या श्रेणीत सदर आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धास्थळी विशाल स्वागत गेट आर.सी.जांगीड ज्वेलर्स प्रतिष्ठानाद्वारे प्रायोजित करण्यात आले होते. तसेच स्पर्धकांना लागणारे एनर्जी ड्रिंक एनर्जेल याचे प्रायोजकत्व श्री ताहिरभाई यांनी स्विकारले होते.
स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळेस मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले खामगांव विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री आकाशदादा फुंडकर, प्रमुख अतिथी अकोला येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ नरेंद्र भागवत, मिसेस इंडिया युनिव्हर्स राहिलेल्या व अनेक जाहिरातीत आणि नुकत्याच येऊ घातलेल्या एका मराठी चित्रपटात अभिनय केलेल्या श्रीमती रुपल मोहता, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ शेळके साहेब, पोलीस उपअधिक्षक श्री विनोद ठाकरे साहेब, सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ अशोक बावस्कर, एनर्जेल एनर्जी ड्रिंकचे श्री ताहिरभाई, रोटरी क्लब अध्यक्ष रो सुरेश पारीक, रोटरी क्लब सचिव रो आनंद शर्मा, प्रकल्पप्रमुख रो देवेंद्र भट्टड, सह-प्रकल्पप्रमुख रो विजय अग्रवाल, इनरव्हील अध्यक्षा सौ रंजीता विजय अग्रवाल व रोट्रॅक्ट अध्यक्ष हरीश राठी हे सर्वजण उपस्थित होते.
३ किलोमीटर श्रेणीत महिला गटात कु अस्मिता सोनार ही विजेता ठरली तर कु गौरी राठोड द्वितीय आणि कु सिद्धी पाटील ही तृतीय आली. ३ किलोमीटर श्रेणीत पुरुष गटात देवानंद दांडगे हा विजेता ठरला तर ऋषिकेश वावरे द्वितीय आणि महेश ढोले हा तृतीय आला. ५ किलोमीटर श्रेणीत महिला गटात कु शिवानी देशमुख ही विजेता ठरली तर कु आकांक्षा निंबाळकर द्वितीय आणि कु कोमल घई ही तृतीय आली. ५ किलोमीटर श्रेणीत पुरुष गटात सचिन खोरने हा विजेता ठरला तर अतिक चौहान द्वितीय आणि देविदास बारे हा तृतीय आला. १० किलोमीटर श्रेणीत महिला गटात कु निकिता राऊत ही विजेता ठरली तर कु ज्ञानेश्वरी ओमने हिने द्वितीय स्थान पटकाविले. १० किलोमीटर श्रेणीत पुरुष गटात सागर सादगीरे हा विजेता ठरला तर गणेश उबाळे याने द्वितीय स्थान पटकाविले. सर्व श्रेणींतील विजेत्यांसाठी हजारो रुपयांची भव्य रोख बक्षिसे व मेडल्सचे नियोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी सवलतीच्या फक्त ५० रुपयांच्या दरात सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. इतर सहभाग्यांना स्पर्धेत परिधान करावयाचे टी-शर्ट मोफत देण्यात आली होती तर सर्वच श्रेणींतील सहभाग्यांना शर्यतीच्या वाटेत आर.ओ. पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक आणि चहा-नाश्ता देखील देण्यात आले.
या स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी नगर परिषद खामगांव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान व व्यायामशाळा उपलब्ध करून दिली होती तर पोलीस प्रशासनाने रस्ते वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. शासकीय सामान्य रुग्णालय यांनी सर्व स्पर्धकांसाठी डॉक्टर्स आणि परिचारकांची आरोग्यसेवा व रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. एवढेच नव्हे तर सदर स्पर्धेत जखमी झालेल्या ३ स्पर्धकांना स्पर्धा संपल्यानंतरदेखील रुग्णसेवा उपलब्ध करून दिली ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख रो देवेंद्र भट्टड, सह-प्रकल्पप्रमुख रो विजय अग्रवाल, रोटरी क्लब अध्यक्ष रो सुरेश पारीक, रोटरी क्लब सचिव रो आनंद शर्मा यांचेसह सर्व रोटरी सदस्यांनी अथक प्रयत्न केले.
إرسال تعليق