जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर कॉलेज आवार येथे स्नेहसंमेलन


खामगाव : राष्ट्र माता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 11 व 12 जानेवारी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर जूनियर आणि सीनियर कॉलेज आवार येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आली आहे त्यानिमित्ताने 11 जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे खामगाव नगरीचे सुप्रसिद्ध उद्योगपती संतोष  देशमुख साहेब तसेच खामगाव ग्रामीणचे ठाणेदार केशव वाघ खामगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  गायकवाड   कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले  जिजाऊ स्कूल ऑफ कॉलरचे मुख्याध्यापक डी एस जाधव ,उप मुख्याध्यापक संतोष अल्हाट  उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा रामकृष्ण गुंजकर यांनी उपस्थित पालकांना आपले अध्यक्ष भाषणातून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आजची काळाची गरज आहे याचे पुरेपूर मार्गदर्शन केले वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देऊन पालकांना सांगितले तसेच प्रमुख पाहुणे  संतोष देशमुख यांनी मुलांना उद्योगाच्या बद्दल खूप विस्तृत माहिती दिली व उद्योग कसा करायचा याबद्दल विस्तृत माहिती दिली तसेच खामगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड  यांनी पालकांनी अवास्तव स्वप्न न बाळगता मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्यामध्येच मुलांना करिअर करण्याचे मार्गदर्शन केले व स्नेहसंमेलनाचे आयोजन कशासाठी असते या संबंधित सविस्तर माहिती आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थी व पालकांना दिली प्रस्ताविक जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर चे मुख्याध्यापक डी एस जाधव  यांनी केले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाच्या रंगारंग कार्यक्रमा चे रीतसर उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा कार्यक्रमाचा आस्वाद घेतला पंचकृषीतील बहुसंख्य पालक उपस्थित होते स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य वेगवेगळ्या प्रकारचे ड्रामा सोलो डान्स देशभक्तीपर गाण्यावर मुलांनी सादरीकरण केले 11 जानेवारीच्या कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन ठाकरे मॅडम व ज्योती मोरे मॅडम यांनी केले अशी माहिती कॉलेजचे प्रसिद्धीप्रमुख नवनीत फुंडकर यांनी कळविली आहे










Post a Comment

أحدث أقدم