बनावट सिमेंटच्या ३०० बॅगा देऊन जळगाव जा. येथील इसमाची १ लाखाने फसवणूक


खामगाव - जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील रहिवासी राजेंद्रसिंग लोकेंद्रसिंग बैस (२५) यांनी स्थानिक ताजनगर मधील रहिवासी तसेच सिमेंट पुरवठादार शे. सलीम शे. जलील (अं.४५) याचेकडुन १५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २३ दरम्यान घराच्या बांधकामासाठी अल्ट्राटेक कंपनीचे ३०० बंग सिमेंट (प्रति बेंग ३३० प्रमाणे) असे एकुण ९९ हजाराचे सिमेंट खरेदी केले होते. बांधकामादरम्यान सिमेंट बनावट असल्याचे लक्षात आल्यावरून राजेंद्रसिंग बैस यांनी शे. सलीम शे जलील याला याबाबत जाब विचारला होता.

आयावेळी त्यांना से सलीम याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे राजेंद्रसिंग बैस यांच्या लक्षात आले. याप्रकरणी राजेंद्रसिंग लोकेंद्रसिंग बैस आज २५ डिसें २३ रोजी जळगाव जामोद पोस्टेला फिर्याद दिली फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरूध्द भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पीएसआय दोडके करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم