आदर्श पंतप्रधान स्व.अटलिहारी यांचे स्वप्न आज आपल्यासोर पूर्ण होत आहे, आपण मोठे भाग्यवान -आ.अँड फुंडकर

 भाजपच्या वतीने स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त सुशासन दिन साजरा

 *खामगाव* ::-  भारताचे माजी आदर्श पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कलम 370 हटविणे, राममंदिर ची उभारणी सारखे कामे पूर्णत्वास जात आहे, ही कामे  आज आपल्यासमोर पूर्ण होत आहे,आपण खूप भाग्यवान आहोत असे प्रतिपादन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. 


     भाजपचे वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती भाजप कार्यालयात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त भाजप चे वतीने सुशासन दीन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम आ अँड आकाश फुंडकर यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी पुढे बोलताना आ अँड फुंडकर म्हणाले की स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे सारखा राजकारणातला लोहपुरुष कोणी नाही. तीन वेळा पंतप्रधान असताना त्यांनी सर्वप्रथम कृषी क्षेत्रातील दुकानदारी बंद केली. व स्वतः जातीने लक्ष घालून देशात खरी हरितक्रांती केली. तसेच रस्ता शिवाय गावाचा कोणताच विकास होत नाही हे त्यांना माहीत होते.त्यामुळे त्यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजना आखली. या महत्वकांशी योजनेने संपूर्ण देशाचे चित्र बदलले. सर्व गावे मुख्य रस्त्याशी जोडले. त्यामुळे देशाचा खरा विकास सुरू झाला. संपूर्ण जगाचा विरोध असताना सुद्धा त्यांनी देशाच्या रक्षणासाठी अणुचाचणी केली.प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अभूतपूर्व कामे केली. त्यांच्या कविता, भाषणातून ते देत असलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत. एक देश एक निशाण या घोषवाक्य प्रमाणे काश्मीर मध्ये कलम 370 हटविणे, राम मंदिर उभारणे हे त्यांचे स्वप्न होते. परंतु तेव्हा अनेक पक्षाच्या समर्थित सरकार असल्यामुळे ते नाही करता आले. परंतु आता त्यांचे तालमीत घडलेले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करीत आहेत. आता 370कलम हटल, राम मंदिर होत आहे, आता समान नागरी कायदा हा एक प्रश्न राहिला आहे तो सुध्धा लवकर निकाली निघेल. अश्या खऱ्या राष्ट्रभक्त , लोकसेवक, अटलिहारी वाजपेयी यांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असे आवाहन याप्रसंगी आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. यावेळी स्व. अटलजींच्या जीवनावर तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी तर अटलजींच्या खामगाव भेटी आठवणी संदर्भात जिल्हा महामंत्री शरदचंद्रजी गायकी यांनी उजाळा दिला. या कार्यक्रमाला खामगाव विधानसभा निवडणूक प्रमुख संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, जिल्हा सचिव राजेंद्र धनोकार, विधानसभा विस्तारक डॉ एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, माजी नगरसेवक प्रवीण कदम ,गणेश सोनोने ,सौ भाग्यश्री मानकर , सौ.शिवानी कुलकर्णी, सौ सुवर्णा वाडोदे,रमेश कावणे ,सत्यनारायण थानवी अनिस जमादार, अशोक हत्तेल ,सतीशअप्पा दूडे , ओम शेठ खंडेलवाल, भाजपा किसान आघाडी विधानसभा प्रमुख संजय ठोंबरे, जितेंद्र पुरोहित, माजी कृ उ बा स सभापति संतोष टाले, रमेश इंगळे, गजानन मुळीक ,नंदू कांडेकर ,शुभम ईटणारे, मुन्नाभाऊ दळी, कृष्णा ठाकूर, दत्ता जवळकार ,प्रसाद येदलाबादकर, संतोष येवले, गजानन मुळीक, सतीश गवळी, मयूर घाडगे ,दिलीप गुप्ता, चंद्रकांत धोंडस, पवन ठाकूर, रोशन गायकवाड ,शुभम देशमुख, संतोष शेगोकार ,सय्यद मुमताज सय्यद अली ,अब्दुल हमीद अब्दुल हमीद ,अब्दुल रशीद अब्दुल करीम, आधी भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

أحدث أقدم