शेतकरी उपोषणाला प्रहार पक्षाचा पाठिंबा!
गजानन लोखंडकार यांनी दिली उपोषण मंडपाला भेट
खामगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील बोरी आडगाव या गावात मागील चार दिवसांपासून शेतकरी उपोषणाला बसले असून शासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते परंतु शासनाला उपोषण कर्त्यांना समजविण्यात यश आले नाही. उपोषण कर्त्यांमध्ये श्याम किर्तने, वासुदेव बोहरपी, किशोर तायडे, विठ्ठल ठाकरे, गजानन नाईक, विठ्ठल घोंगे, मुरलीधर ठाकरे या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला २७ डिसेंबर पासून सुरुवात केली आहे. निवेदनामध्ये नमूद आहे की यावधी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. २१ दिवसाच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे. तरी खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश्य परिस्थीती आहे असा नोंदविला गेला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आलेले आहे. या अनुषंगाने आपण सरकार माय-बाप म्हणून आमच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी ४७ पैसे आणेवारी येऊनही खामगाव तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही. गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी देशोधळीला लागला. व पुन्हा यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-याला कुठल्याही प्रकारचा आधार राहीला ताही वारंवार मागणी करुनही खामगाव तालुका हा दुष्काळ सदृश्य परिस्थीतीत नोंदविला परंतु दुष्काळग्रस्त नोंदविला गेला नाही ही खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शोकाकित बाब आहे. मागण्या मान्य न झाल्यास येणाम्या सोमवारी बोरी आडगाव पासून उपविभागीय कार्यालया पर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे नियोजन सुद्धा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. आमदार बच्चू कडू यांनी घेतली उपोषणाची दखल नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात बचूकडू यांनी सरकार ला घरचा आहेर देत चांगलेच धारेवर धरले होते त्यांचे सभागृहातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आलेले भाषण चांगलेच गाजले होते. आडगाव येथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची दाखल आ. बच्चू कडू यांनी घेऊन त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रहार नेते गजानन लोखंडकार यांना उपोषण मंडपाला भेट घेण्यासाठी पाठविले त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंडकार यांनी संबंधित सर्व अधिकायांशी फोन वरून संपर्क साधला असून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठोस असे पाऊल उचलून सदर उपोषण सोडविले जाईल असा विश्वास शेतकऱ्यांना दिल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात खुश झालेले पाहायला मिळाले.
إرسال تعليق