ग्लेन मार्क मल्टिनॅशनल कंपनी द्वारे आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मधे "कफोलॉजि पाठशाला" 



 घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक चर्चासत्र व माहिती "कफोलॉजि पाठशाला" या शीर्षका अंतर्गत घेण्यात आली. आदर्श ज्ञानपीठ येथे सर्वप्रथम  महाराणा प्रताप शिक्षण बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य कविश्वरसिंह राजपूत यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी माहिती सांगण्याकरिता लाभलेले मान्यवर डॉक्टर श्री विनोद वानखडे सर तसेच ग्लेन मार्क कंपनीचे डिस्ट्रिक्ट प्रभारी श्री विजय गावंडे सरांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.   बदलत्या हवामानामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कसे टाळावे आणि निरोगी राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या या संबंधीची पाठशाला, औषधी क्षेत्रात नावाजलेल्या ग्लेन मार्क मल्टिनॅशनल कंपनी द्वारे घेण्यात आली होती.  या पाठशाळेत डॉ. विनोद वानखडे सरांनी आरोग्य निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणकोणत्या गोष्टी कडे  लक्ष द्यावे तसेच विद्यार्थ्यांनी पौस्टिक अन्न खावे तसेच पॅकेट बंद वस्तू पासून लांब राहावे, सर्दी खोकला झाल्यावर दैनंदिन दिनचर्या व शाळेत येतांना घ्यावयाची काळजी अश्या विविध आरोग्य विषयक गोष्टींवर आपल्या संबोधनातून प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहिती चर्चासत्राद्वारे दिल्यानंतर त्यांना आलेल्या आरोग्य संबंधित प्रश्नाचे निरासन करण्यात आले.  आरोग्य विषयक  पाठशाला यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले .  तसेच आरोग्य विषयक जनजागृती होण्याकरिता केलेल्या प्रयत्नासाठी आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खामगांव शाळेला प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अश्विनी देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका ममता महाजन, प्रियंका राजपूत, ज्योती वैराळे, माधुरी उगले, अश्विनी देशमुख, कल्पना कस्तुरे, अलका वेरूळकर, दामिनी चोपडे, प्रिया देशमुख, सारिका सरदेशमुख, प्रतीक्षा साबळे, संगीता इंगळे, प्रियंका वाडेकर, अश्विनी वक्ते, कोमल आकणकर, सपना हजारे,वंदना गावंडे, संगीता पिवळाटकर, सुवर्णा वळोदे, राजकन्या वडोदे, प्रतिभा गावंडे, लटके  आदींनी प्रयत्न केले.


Post a Comment

أحدث أقدم