महाराष्ट्रतील  इंग्रजी शाळा संस्थाचालकांचा 13 डिसेंबर रोजी मोर्चा

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मेष्टा  विभागीय उपाध्यक्ष प्रा रामकृष्ण गुंजकर यांचे आवाहन

जनोपचार संपर्क 8208819438

खामगाव - महाराष्ट्र राज्यातील सर्व इंग्रजी शाळा संस्थाचालकांनी दि.१३ डिसेंबरला एक दिवसीय महाराष्ट्र भर शाळा बंद ठेऊन आपल्या मागण्या व न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष श्री संजयराव तायडे पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या मोर्च्यामध्ये इंग्रजी शाळांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या साठी गेल्या अनेक वर्षांपासून संघटना सरकार सोबत भांडत आहे तरी सुद्धा सरकार रास्त असलेल्या मागण्या पूर्ण करीत नाही आणि गेल्या पाच वर्षापासून बाकी असलेले 25% RTE प्रतिपूर्ती, टी,सी,नसताना देण्यात येणारे प्रवेश ,अनावश्यक ऑनलाईन कामे या मधून इंग्रजी शाळाना वगळण्यात यावे अशा अनेक मागण्यासाठी म्हणून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे एकदिवसीय शाळा बंद ठेऊन आपल्या सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह सर्वांनी उपस्थित राहावे. असे आव्हान बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत चोपडे तसेच अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर , खामगाव तालुकाध्यक्ष सागर उकर्डे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم