शिवसेनेच्या पुढाकाराने एकाच दिवशी मिळाल्या शहापूर शिवारात दोन डीपी

 शहापूर गावातील शेतकऱ्यांनी मानले शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांचे आभार!

खामगाव :-शहापूर शिवार आणि देऊळखेड शिवार मधील मागील दहा ते बारा दिवसापासून दोन्ही शिवारातील Dp जळाल्यामुळे शेतकरी वारंवार महावितरण विभागाला भेटले असता शेतकऱ्यांना उडवा उडवीचे उत्तर महावितरण कडून देन्यात येत होते.


सर्व शेतकरी शेतीचे काम धंदा सोडून अटाळी  सबस्टेशन, खामगाव महावितरणच्या मागील काही दिवसापासून चकरा मारत असताना शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांना शेतकरी भेटले असता स्वतः माननीय राजेंद्र बघे यांनी सर्व शेतकऱ्यांन सोबत महावितरण गेले असता अटाळी सबस्टेशन,शेगाव रोड,खामगाव ऑफिस, तिनी ऑफिस वर अधिकारी मिळून आले नाही शेतकऱ्याने अधिकाऱ्याला फोन लावला असता.

अधिकाऱ्याने अटाळी J.E, इंजिनीयर यांचा नंबर दिला जेव्हा शेतकऱ्याने फोन लावला तेव्हा इंजिनियर असा म्हणला तुम्हाला माझा नंबर  कोणी दिला. आणि शेतकऱ्याचा फोन कट केला.जेव्हा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी फोन केला तेव्हा वायरमन पासून ते सर्व अधिकारी सर्वांनी उडवा उडवीचे उत्तर दिले.

एक म्हणतो तुमचा फ्लेवर रिपोर्ट आला नाही, दुसरा म्हणतो तुम्ही मेंटेनन्स ला जा, तिसरा म्हणतो अटाळी इंजिनिअरची बदली झाल्यामुळे सध्याच तुमचे काम होऊ शकत नाही पाच सहा दिवसांनी पाहू तुमचा  फेलेवर रिपोर्ट मिळेल तेव्हा पाहू.असा कार्यक्रम सकाळपासून ते संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत चालला.जेव्हा बघे शिवसेना स्टाईल वर आले आणि अधिकाराला धारेवर धरून त्यांना विचारणा केली तुम्ही आमच्या सारख्याला उडवाउळीचे उत्तर देऊ शकता तर एका सामान्य शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे.सतत 40 ते 45 किलोमीटर वरतून शेतकरी आपला शेतीचा हंगाम सोडून जर तुमचे एम एस ई बी चक्रर मारत असेल त्यांचे काम होत नसेल. 

काम तर सोडा त्यांना जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर आम्ही सत्तेत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसेल तर आमचा सत्यत असून काय फायदा असे म्हणत आणखी हमरी तुमरी केली तेव्हा पूर्ण यंत्रणा जागृत झाली आणि नंतर ऑटोमॅटिक फेलेव्हर रिपोर्ट सुद्धा आला आणि शब्द सुद्धा दिला की उद्याला संध्याकाळपर्यंत तुमच्या दोन्ही डीपी लागतील.

आणि त्यांनी त्यांचा शब्द पाडत दुपारपर्यंत दोन्ही डीपी लावून सुरू करून दिल्या.



शहापूर,वाहाळा,देऊळखेड येथील शेतकऱ्यानीं तोंड भरून कौतुक करत म्हणाले.

तुमचे वय खूप कमी आहे

तुमच्या वही मनाने तुमचे काम पाहून आम्ही खरोखर भारावून गेलो आहोत. 

आम्हीं आज पर्यंत खूप नेते पाहिले परंतु आज पर्यंत कुण्या नेत्यांनी आमची  एवढ्या फास्ट काम करून दिले नाही.

तुम्ही एका दिवसात आमचा प्रश्न निकाली काढला

नाहीतर नेत्यांचा एकच शब्द असतो आज या उद्या या परवा पाहू असे नेतेच उडवा उडविचे उत्तर देतात.

नाही तर आम्हालाच म्हणतात तुम्ही पैसे भरा बिल भरले का, का नाही भरले आम्हालाच बोलतात.

सर्व शेतकऱ्यांनी तोंड भरून कौतुक करत तुमच्या कार्यास आमच्या आशीर्वाद आहे.

तुम्ही आम्हाला केव्हाही हाक द्या आम्ही तुम्हाला तुमच्या प्रमाणे साथ देऊ आणि असा शेतकऱ्यांनीही शब्द दिला.

 व सर्व शेतकऱ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख माननीय राजेंद्र बघे यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख सोपान वाडेकर, शहापूर शिवसेना शाखाप्रमुख सुभाष चौरे, टेंभुर्णा येथील शाखाप्रमुख उमेश पाटील  डिघोळे,योगेश डिघोडे,सागर मेतकर, जगन्नाथ मेतकर,सुरेश तिजारे,अशोक कारंजकर,संजय चतरकार,सुरेश तिजारे,आदीं बहु संख्येने शहापूर मधील शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم