संग्रामपूर तालुक्यात मराठा पाटील युवक समिती च्या 89 व्या शाखेची स्थापना 



संग्रामपूर जनोपचार न्यूज :- घटस्थापनेच्या दिवशी मराठा पाटील युवक समिती च्या 89 व्या शाखेची स्थापना संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथे करण्यात आली. मराठा पाटील युवक समिती करीत असलेल्या कार्याने प्रभावित होऊन संग्रामपूर तालुक्यातही समाजाचे संघटन व्हावे या उद्देशाने तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेऊन त्याची सूर्वात ही काल हिंगणा गावात करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मराठा पाटील युवक समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. गजानन दादा ढगे पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रवीण (छोटू) पाटील, जिल्हा सदस्य रवींद्र पाटील, जिल्हा संघटक सतीश पाटील, खामगाव तालुका कार्याध्यक्ष राम पाटील, शेगाव तालुका अध्यक्ष श्याम पाटील, संग्रामपूर तालुका कार्याध्यक्ष कैलास मोरखडे, नांदुरा माजी शहर अध्यक्ष अतुल पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाखा फलकाचे अनावरण करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या नंतर बैठक घेऊन मराठा पाटील युवक समिती करीत असलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा शेगाव तालुका अध्यक्ष श्याम पाटील यांनी दिला तर समिती च्या स्थापने पासून तर आज पर्यंतचा समिती चा प्रवास व समिती चे कार्य समिती चे ध्येय धोरण संस्थापक अध्यक्ष मा. गजानन दादा यांनी दिला. बैठकी दरम्यानच संग्रामपूर तालुक्याच्या कार्याध्यक्ष पदी कैलास पाटील मोरखडे यांची नियुक्ती करण्यात आली. 
जाहिरात फक्त 99 रुपयात
संपर्क 820 881 94 38

सदर कार्यक्रमास शाखा अध्यक्ष आकाश मोरखडे, उपाध्यक्ष विवेक मोरखडे, कार्याध्यक्ष राजेश मोरखडे, सदस्य निखिल मोरखडे, संदीप मोरखडे, नंदकिशोर मोरखडे, वैभव पाटील, विष्णू पाटील, ओम पाटील, शिवा गावंडे, अजय मोरखडे, आदी सह गावकरी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم