खामगाव मधील घोराळे परिवाराकडून अनोख्या पद्धतीने श्रावण मास साजरा


खामगाव मधील रामेश्वरानंद नगर सावजी ले आउट येथिल रहिवासी स्वा.सैनिक रामेश्वर  घोराळे यांच्या परिवारातील गणेश घोराळे यांनी आपल्या कुटुंबासोबत अनोख्या पद्धतीने श्रावण मास साजरा करून समाजापुढे अध्यात्माला नैसर्गिक, पर्यावरण पुरक जोड देऊन भक्तीमय आदर्श निर्माण केला आहे.

सध्या सर्व जगामध्ये महादेवाची भक्ती मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समुदायातील लोक करत असतात ज्यामध्ये महादेवाला बेलाचे पान फळे व इतर गोष्टी अर्पित करून महादेवाची पूजा करतात. परंतु सध्या मोठ्या प्रमाणावर बेलाचे झाडे नष्ट होत आहेत

. ही बाब लक्षात घेऊन श्रावण मासा पुरतीच नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी महादेवाची भक्ती सातत्याने सुरू राहावी ह्या भावनेने घोराळे परिवारातील गणेश घोराळे, मनीषा घोराळे व भार्गव घोराळे यांनी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला अधिकमासात बेलाचे फळ जमा करून त्यामधील बियां वेगळ्या करून त्यावर पारंपारिक पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून सुमारे दोनशे पेक्षा अधिक रोपटे तयार केले, व खामगाव शहरांमधील जवळपास सर्व महादेवाच्या मंदिर परिसरात बेलाचे झाडे लावली.

ज्यामध्ये सुटाळा,अनिकट, माऊली नगर,एनसीसी बटालियन, राममंदिर नांदुरा रोड, गजानन महाराज मंदिर सुटाळा,सिल्वर सिटी हॉस्पिटलजवळ, अकोला रोडवरील ओंकारेश्वर मंदिर,सरस्वती विद्या मंदिर,जी वी मेहता नवयुग विद्यालय, अशा इतरही ठिकाणी.रामेश्वर घोराळे यांचे पुत्र गणेश घोराळे सून मनीषा घोराळे व नातू भार्गव घोराळे परिवाराने 200 पेक्षा अधिक बेलाचे झाडे तयार करून लावून महादेवांच्या भक्तापुढे आदर्श निर्माण केला आहे.

रामेश्वर घोराळे हे लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे फार जुने कार्यकर्ते आहेत. व गणेश घराळे हे विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत व सध्या त्यांच्याकडे खामगाव जिल्हा प्रमुख,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी जबाबदारी आहे. परिसरातील लोकांनी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم