#शासन_आपल्या_दारी या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाचा पुढील टप्पा आज लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये #बुलढाणा जिल्ह्यात पार पडला. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील १० लाख ४ हजार ६४१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांमधून ६१८ कोटी रुपयांचे लाभ मिळवून देण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमधील ५१ हजार लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट खात्यात मदत वर्ग करण्यात आली. तर मेहकर तालुक्यातील ५० तलाठी कार्यालयाचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले. तसेच बुलढाणा नगर परिषदेने प्रकाशित केलेल्या 'नवप्रवर्तन' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यातील सर्वसामान्य जनतेला विविध शासकीय योजनांचे थेट लाभ मिळवून देणारा कार्यक्रम घेणारे आपले राज्य हे देशातील एकमेव राज्य आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजवर राज्यातील १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिले असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
राज्यातील महायुती सरकार हे फेविकॉल प्रमाणे मजबूत आहे. आजवर राज्यातील ३२ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. #लेक_लाडकी या योजनेतून मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला १ लाख रुपये देण्यात येतात. बचतगटांच्या उत्पादनांना उत्तम बाजारपेठ मिळावी यासाठी उद्योग भवन उभारणे, स्वस्त दरात कर्ज मिळवून देणे याला शासन प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.
आधीच्या सरकारने आपल्या इगोमुळे केंद्राकडे कधीही मदत मागितली नाही मात्र आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीला जातो असेही यावेळी बोलताना सांगितले.
एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून यांच्या डोळ्यात खुपायला लागला, त्यामुळेच काहीही करून त्याला खुर्चीवरून खाली खेचण्याची कारस्थाने सुरु झाली आहेत. मात्र राज्यातील सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने कुणी कितीही कारस्थाने केली तरीही माझे काही वाकडे करू शकणार नाही असे यावेळी निक्षून सांगितले.
जालना येथे झालेली लाठीचार्जची घटना दुर्दैवी असून या घटनेमुळे दुःख झाले. मात्र मराठ्यांचा ज्यांनी गळा घोटला तेच आज त्यांच्यासाठी गळे काढत आहेत. जालना येथील घटनेनंतर पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून दोन्ही उप-अधीक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तर अपर पोलीस महासंचालक ( कायदा - सुव्यवस्था ) संजय सक्सेना यांच्या मार्फत या घटनेची चौकशी करण्यात येईल असे सांगितले. तसेच या घटनेत चूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे यासमयी बोलताना स्पष्ट केले.
यासोबतच बुलढाणा शहर पोलीस स्थानक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव,राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पाणीपुरवठा मंत्री आणि बुलढाणाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार रक्षा खडसे,आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांड्ये, अमरावती जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, बुलढाणाच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो लाभार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق