सिल्वरसिटी मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मध्ये जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा.
डॉ पंकज मंत्री यांनी हृदय निरोगी साठी दिला सल्ला!
खामगाव :- सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या बुलढाणा जिल्यातील एकमेव अश्या सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटर, जलंब रोड, खामगाव येथे आज शुक्रवार दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी “वर्ल्ड हार्ट डे” (World Heart Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंचावर सिल्वरसिटी हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन, संचालक डॉ गौरव गोयंका, डॉ आनंद राठी, भागधारक डॉ गिरीश पवार, डॉ अनुप शंकरवार व आहारतज्ञ् डॉ सौ पूजा तेरेदेसाई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते द्विप प्रज्वलन व धंवन्तरी पुजनाने करण्यात आली. रीसेप्शानिस्ट सौ. जया इंगळे यांनी सूत्रसंचालन केले व आहार तत्ज्ञ डॉ पूजा तेरेदेसाई यांनी प्रस्तविक केले. त्यात त्यांनी हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या आहार बद्दल सविस्तर माहिती दिली. “वर्ल्ड हार्ट डे”चे औचित्य साधून सिल्वरसिटी हॉस्पिटल खामगावचे व्यवस्थापकीय संचालक डॉ पंकज मंत्री यांनी हृदय निरोगी राहण्यासाठी काय करावे व काय करू नये ते सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात सिल्वरसिटी हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर यांनी “वर्ल्ड हार्ट डे” चे महत्व, हृदय रोग का होतो व त्या साठी कारणीभूत बाबी या बद्दल सविस्तर माहिती दिली. हृदय रोग टाळण्यासाठी जागरुकता असणे का गरजेचे आहे या बद्दलची माहिती उपस्थितीतांना दिली सर्वांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार, व्यसनमुक्त सवयी व नियमित औषधपचार करावा असा सल्ला दिला..
हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी श्री निलेश बैरागी यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा या करिता डॉ पूजा तेरेदेसाई , सौ. जया इंगळे , प्रशासकीय अधिकारी श्री निलेश बैरागी व सिल्वरसिटी हॉस्पिटल चे कर्माचाऱ्यांनी प्रयत्न केले असे हॉस्पिटल चे कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे..
إرسال تعليق