वंचित बहुजन आघाडी पळशी बु नागरिकांच्या पाठीशी


खामगाव;-गत तीन वर्षांपासून बाळापूर ते उदयनगर रस्त्याचे काम करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून, यामुळे पळशी बु. येथील नागरिकांचे व व्यावसायिकांचे नुकसान होते आहे. गावामधील दुतर्फा नालीचे बांधकाम रखडल्यामुळे व्यावसायिकांना याचा फार मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे व इतर पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

   निवेदनात नमूद आहे की, पळशी बु. येथील बसस्‍थानक परिसरात चालु असलेले रोडचे काम रोडच्या मध्यापासून जुन्या रोड प्रमाणे ८० फुट जागेमध्ये काम करावे, रोडचे कामामुळे बस स्टॅण्ड परिसरात असलेले. विनोदकुमार शामराव चिंचोलकार यांचे मालकीचे दुकान रस्त्याअभवी बंद आहे. त्यामुळे त्यांचे कधीही न भरून निघणारे आर्थीक नुकसान झालेले आहे. तसेच इतर व्यावसायीकांचे सुध्दा नुकसान झालेले आहे.  करीता वरील कामाचा त्वरीत निपटारा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच काम त्‍वरीत सुरु न झाल्‍यास उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

     यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे, कृउबासचे  उपसभापती संघपाल जाधव, माजी संचालक रमेश गवरगुरु, विशाल तायडे, गुणवंत वाकोडे, जगदीश, तिडके प्रमोद,जावडेकर, विनोद चिंचोलकार, प्रभाकर जुमळे,शिवदास बाहेकर, प्रल्हाद बोरसे, उमेश धनोकार, ज्ञानेश्वर गुरव व इतर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم