भाजपच्या वतीने सेवा पंधरवाडा अंतर्गत रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप


 खामगाव:- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा  सप्ताह संपूर्ण भारतात राबविल्या जात आहे. खामगावात भाजयुमो, विद्यार्थी आघाडी, भाजप खामगाव शहर च्या वतीने उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम पार पडला. 


       या सप्ताह अंतर्गतभाजपच्या वतीने खामगाव मतदारसंघात विविध विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटन, वृक्षारोपण, विविध लोकं उपयोगी सामाजिक कामे करण्यात येत आहेत. यांतर्गत आज खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांचे उपस्थित उपजिल्हा रुग्णालय खामगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.


या रक्तदान शिबिरात सागर काळजाते, संतोष तायडे, प्रदीप टकले , अंकुश खोंड, प्रवीण डोलतडे, नंदकिशोर मारके, विवेक शर्मा, प्रवीण कात्रे, गोपाल अत्तरकार, मेहुल जाधव, राजवीर श्रीनाथ, हिमांशू खत्री, विकास कुटे , नागेश राठोड, भागवत मानकर, महेश खानंदे, रुपेश सूर्यवंशी, सागर बाजड, निलेश उंबरकार, व पंकज सरकटे यांनी रक्तदान केले. यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर, भाजपा जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी,डॉ. एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड आदी भाजप , भाजयुमो, विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم