श्री खामगाव महोत्सव 2023

 खामगावात सोमवारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन


खामगाव: येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर यंदा प्रथमच श्री खामगाव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होणार असून सोमवारी सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले आहे.


खामगाव शहरातील कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावर्षी प्रथमच श्री खामगाव महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाला सोमवारी सायंकाळी ६ वाजता निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाने सुरुवात होईल. मंगळवारी श्री गणेशाची स्थापना करण्यात येईल. २० सप्टेंबर रोजी बहारदार संगीत रजनी, २१ सप्टेंबर रोजी गीता परिवार संगमनेरचे संजय मालपाणी यांचे भगवदगीतेवरील निरूपण, २२ सप्टेंबर रोजी शिवकालीन मर्दानी शस्त्र प्रदर्शन, २३ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांचे उद्बोधन, २३ सप्टेंबर रोजी गौरी अशोक थोरात यांचा साक्षात जिजाऊ माँसाहेब हा एकपात्री प्रयोग सादर होईल. २४ सप्टेंबर रोजी सामूहिक अथर्व शीर्ष पठण, २४ सष्टेंबर रोजी श्री हनुमान गणेशोत्सव समितीच्यावतीने राजा रयतेचा हे शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील महानाट्य सादर केले जाईल. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री खामगाव महोत्सव आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم