दुर्दैवी घटना

 अंत्रज फाट्याजवळ अपघात एक ठार चार गंभीर


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- , अंत्रज कडून खामगाव कडे भाजीपाला घेऊन येणाऱ्या ऑटोला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली .ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून या घटनेत एक जन ठार तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे . याबाबत मिळालेल्या माहितीनुसर शिवाजी भारसाकडे यांच्या ऑटो मध्ये अंतरज येथील निलेश बगाडे, अनिल बगाडे व पुरुषोत्तम बगाडे ह्या तीन भावंडांसह गावातीलच आणखी एक जण आपल्या शेतातील भाजीपाला खामगाव येथील बाजारपेठेत आणत होते .दरम्यान खामगाव चिखली मार्गावरील अंतरज फाटा जवळ असलेल्या सिंधी नाल्याजवळ एका वाहनाने मागून धडक दिली. यामध्ये अनिल बगाडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे .अपघातातील अकोला रेफर करण्यात आले असून वृत्तलेपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती



Post a Comment

أحدث أقدم