.समाज सेवेला भक्ती ची जोड

 दशरथ घुले यांचा अधिक व श्रावणातील मौन व्रतचा  37 वा दिवस


खामगाव:- अधिक व श्रावण महिन्यानिमित्त संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ घुले यांनी सुख शांती लाभावी याकरिता सामाजिक कार्य म्हणून दोन महिन्यांचा व्रत सुरू केला आहे संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ घुले हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. तसेच वैष्णवी देवी यात्रा असो की कावड यात्रा येथे जाणाऱ्या भाविकांना देखील ते सामाजिक कार्य म्हणून सहकार्य करतात. व जय जे भाविक कावळ आणण्याकरिता जातात त्यांना सुख शांती लाभो या करिता त्यांनी आपला मौन व्रत सुरू केला आहे. त्यांचा मौन व्रत हा दर वर्षी श्रावण महिन्यात असतो तो एकच महिन्याचा असतो परंतु यावर्षी अधिक महिन्यात श्रावण आल्याने त्यांनी आठ आठवड्याचा म्हणजे दोन महिन्याचा मौन व्रत सुरू केला आहे गेल्या दोन-तीन वर्षापासून आपल्या देशात कोरोना डोळे येणे अनेक आजार उद्भावत आहेत्याच अनुषंगाने देशाला शांती मिळावी व सर्व सुख-समृद्धीने राहावे या करिता त्यांनी मौन व्रत केलाआहे.त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم