पिंपळगाव राजा येथील जागृत शिवमंदिर
पिंपळगाव राजा- येथील पुरातन असे शिवमंदिर (देवळावाले) असून ही जागृत मंदिर या ठिकाणी भाविकभक्त येतात. श्रावण महिन्याच्या सोमवारी भक्तांची रेलचेल असते.
गावापासून अवघ्या अर्धा किलो मीटर अंतरावर शेतात पुरातन असे शिवमंदिर असून त्याला देवळावाले असे म्हणतात. त्या मंदिराची स्थापना जवळपास साडेचारशे वर्षापूर्वी मानसिंग देशमुख यांनी स्थापन केली आहे. मंदिर परिसरात एक समोर पायविहीर आहे. त्याच पायविहिरीच्यावर एक सुंदर असा मजला आहे. पंचमदास महाराज यांनी शिवमंदिरात नामसप्ताहाची सुरुवात केली होती. दरवर्षी मंदिरात नामसप्ताह उन्हाळ्यामध्ये साजरा करण्यात येतो. अनेक वर्षे बुलडाणा येथील रामेश्वर जुमळे हे नामसप्ताहाला यायचे. दरवर्षी नामसप्ताह साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होते. जागृत स्थान ओळखल्या जात असल्याने भाविकांचा ओढ या शिवमंदिराकडे आहे. या ठिकाणी अनेक संत येवून गेले.
إرسال تعليق