खामगावातील पत्रकार बांधवांचा गणेशोत्सव
समितीच्या अध्यक्षपदी अनुप गवळी तर सचिव सिध्दांत उंबरकार
खामगाव - संपुर्ण राज्यात जल्लोषात साजरा केला जाणारा गणेशोत्सव यावर्षीपासून खामगाव येथील पत्रकार बांधवांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने दि.२० ऑगस्ट रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते पत्रकार गणेशोत्सव मंडळ खामगाव या नावाखाली गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले व कार्यकारणी गठीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोरआप्पा भोसले होते तर जगदीश अग्रवाल, योगेश हजारे, सुमित खेतान, धनंजय वाजपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वानुमते पत्रकार गणेशोत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी अनुप गवळी, उपाध्यक्ष आनंद गायगोळ, किरण मोरे, सचिव सिध्दांत उंबरकार, कार्याध्यक्ष अमोल गावंडे, सहसचिव मुबारक खान, कोषाध्यक्ष सुमित पवार, सहकोषाध्यक्ष गणेश पानझाडे, संघटक राहुल खंडारे, सहसंघटक शिवाजी भोसले, प्रसिध्दी प्रमुख विनोद भोकरे तर कार्यकारणी सदस्य म्हणून मोहन हिवाळे, शेख सलीम, मोनु शर्मा, सुधिर टिकार, आकाश पाटील, महेंद्र बनसोड, निखिल देशमुख, कुणाल देशपांडे, सुमित खेतान, सुनिल गुळवे, अविनाश घोडके आदींची नियुक्ती करण्यात आली.
إرسال تعليق