मोठ्या संख्येने कावड यात्रेत सहभागी व्हावे - राहुल कळमकार
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- आज पासून मराठी श्रावण महिना सुरू झाला आहे,या ही वर्षी भव्य दिव्य कावड यात्रा हर हर महादेवाच्या गजरात निघणार असून श्री नवयुवक मानाची कावड यात्रे चे अध्यक्ष राहुल भाऊ कळमकार यांच्या नेतृत्वात निघणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक खामगाव शहरातील मानाची कावड यात्रा या वर्षी ही मोठ्या उत्साहात निघेल पहिला सोमवार दि २१ ऑगस्ट तीर्थक्षेत्र नागझरी दुसरा सोमवार दि २८ ऑगस्ट तीर्थक्षेत्र मोहाडी, तिसरा सोमवार दि ४ चार सप्टेंबर तीर्थक्षेत्र येरळी पूर्णा चौथा सोमवार दि ११ सप्टेंबर तीर्थक्षेत्र चांगदेव जल आणून चार ही तीर्थक्षेत्रा वरून खामगाव शहरातील मुख्य पाच मंदिरात जल अभिषेक करणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेवटच्या चौथा सोमवारी कावड यात्रा निघणार असुन तरी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने कावड यात्रे त सहभागी व्हावे असे आव्हाहन मानाची कावड यात्रा अध्यक्ष राहुल भाऊ कळमकार यांनी केले
إرسال تعليق