जबरीने मोबाईल हिसकणाऱ्या दोघांना २ वर्ष ६ महिने कारावास तर मोबाईल घेणाऱ्याला देखील एक वर्षे कारावास व दंड
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थ्याकडून जबरदस्ती मोबाईल हिस्कणाऱ्या दोघांना तसेच चोरीचा मोबाईल विकत घेणाऱ्याला जे एम एफ सी कोर्ट नंबर १ चे न्यायाधीश श्री एस एन भावसार यांनी वेग वेगळ्या कलमाखाली शिक्षा ठोठावली.
![]() |
हेच ते घटनेतील आरोपी |
याबाबत पार्श्वभूमी अशी की, वाडी येथील ओम गुजर हा 25 डिसेंबर 2021 रोजी ट्युशनला जात असताना आरोपी अंकुश गणेश देशमुख व शिवा मोहन धारपवार या दोघांनी त्याला अडवून रस्ता दाखविण्याच्या बहानाने अमृत नगर जवळून गाडीवर बसविले दरम्यान अनिकट रोडवर नेऊन मोबाईल हिसकून पळ काढला.या प्रकरणात पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींना सीताफिने जेरबंद करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. विद्यमान न्यायालयाने या प्रकरणात विविध साक्षी पुरावे तपासून मोबाईल हिसकावून नेल्या प्रकरणी आरोपी अंकुश गणेश देशमुख व शिवा मोहन धारपवार या दोघांना दोन वर्ष सहा महिने कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सजा अशी शिक्षा सुनावली तर मोबाईल विकत घेणाऱ्या प्रवीण दादाराव लांडगे याला एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सजा अशी शिक्षा सुनावली.
![]() |
तपास अधिकारी एएसआय बळीराम वरखेडे |
या प्रकरणाचा तपास तपासअधिकारी एएसआय बळीराम वरखेडे यांनी केला. या प्रकरणात सरकारी अभियोकता श्रीमती लोखंडे मॅडम यांनी युक्तिवाद केला.
إرسال تعليق