जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स चा प्रोग्रेस ट्रेनिंग सोल्युशन्स कंपनीसोबत सामंजस्य करार
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नाविन्यपूर्ण पाऊल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स,आवार हे आपल्या स्थापनेपासूनच आपल्या शैक्षणिक गुणवत्ते करिता ओळखल्या जाते. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर हे सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. याच व्यापक दृष्टीने घेतलेले एक क्रांतिकारी पाऊल म्हणजेच नुकताच झालेला प्रोग्रेस ट्रेनिंग सोल्युशन्स कंपनीसोबतचा सामंजस्य करार. जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स चे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण आणि सचिवा प्राध्यापक सुरेखाताई गुंजकर, प्राचार्य डी एस जाधव सर आणि प्रोग्रेस ट्रेनिंग सोल्युशन्स चे संचालक धीरज पाचपोर हे यावेळी उपस्थित होते. प्रोग्रेस ट्रेनिंग सोल्युशन्स ही एक नामांकित सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग देणारी कंपनी असून विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था द्वारा प्रमाणित आहे.
या सामंजस्य करारानुसार आता जिजाऊ स्कूलच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेनिंग हे शाळेमध्येच उपलब्ध होणार आहे. या ट्रेनिंग मध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचे असलेले कौशल्य जसे की संवाद कौशल्य, स्टेज डेरिंग, आत्मविश्वास निर्मिती, ध्येयनिश्चिती, तणाव व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, नेतृत्व गुण, निर्णय घेण्याची क्षमता, उत्कृष्ट वक्तृत्व, क्रिएटिव्ह थिंकिंग अशा अनेक कौशल्यांचा समावेश आहे ज्यांचा विकास करणे आजच्या कॉम्पिटिशन च्या काळात गरजेची आहे. अनेक सर्वे म्हणतात की नव्या जगात यशस्वी व्हायचं असेल तर गुणवत्ते बरोबर सॉफ्ट स्किल्स सुद्धा हवेत. हे जरी प्रमाणित सत्य असलं तरी बहुतांश शिक्षण संस्था ह्या केवळ शालेय शिक्षणावरच भर देतात व या टक्केवारीच्या खेळामध्ये मुलांच्या सर्वांनी विकासाकडे फारसे लक्ष देत नाही पण जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स हे मात्र यामध्ये अपवाद ठरली असून त्यांच्या केंद्रस्थानी नेहमीच केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य असते व त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर हे नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येते. या उपक्रमा चे उद्दिष्ट केवळ आकलनात्मक विकास करणे एवढेच नसून चांगले व्यक्तिमत्व घडवणे आणि 21 व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात केलेल्या अशा समग्र अष्टपैलू व्यक्ती निर्माण करणे आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा शिक्षणासह गुणवत्तापूर्ण सर्वांगीण शिक्षणाची उपलब्धतेला प्राधान्य दिले आहे. याच धोरणांना अग्रस्थानी ठेवून संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर सचिवा प्रा सुरेखा ताई गुंजकर प्राचार्य देविदास जाधव यांनी हा स्तुत्य उपक्रम संस्थेमध्ये राबविला आहे, येणाऱ्या निकट भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये व्यापक सकारात्मक बदल घडवून आणण्याचा मानस प्रोग्रेस ट्रेनिंग सोल्युशन्स चे संचालक धीरज पाचपोर यांचा आहे.
إرسال تعليق