खामगावात ड्रग्स?

 बसस्थानक परिसरात गुरुवारी रात्री ३. २० वाजताच्या सुमारास रेड


बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गुरुवारी मध्यरात्री पोलसांनी बसस्थानकावर एका व्यक्तीस अटक केली असून त्यांचा कडून ड्रग्स तसेच अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हा व्यक्ती ड्रग्जची तस्करी करतो का, या दिशने आता पोलीस तपास करत आहेत.

समजलेल्या माहितीनुसार, खामगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पंकज जगन्नाथ सपकाळे यांना गुप्त माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी बसस्थानक परिसरात गुरुवारी रात्री ३. २० वाजताच्या सुमारास रेड केली. यात शब्बीर खान उस्मान खान पठाण वय 35 वर्ष (रा. फुलवाडी निंबायत सुरत,गुजरात) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून नगदी १४०० रुपये, दोन मोबाईल, Nitrazepam Tablets IP Nitrosun 10 mg  च्या १८ नग गोळया , १. ५० ग्रॅम मॅकड्रॉन MD ड्रग्ज अंमली पदार्थ, Glucose-D INSTANT ENERGY असे नमुद असलेला हिरव्या रंगाचा कागदी डबा, ज्यामध्ये प्लास्टीक पन्नीत पांढऱ्या रंगाची पावडर असा २५ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. वृत्तलेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती

Post a Comment

أحدث أقدم