माटरगावात शांतता समितीची बैठक

 

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना शाळेत पाठवावे- अप्पर पोलीस अधीक्षक थोरात

मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात

जनोपचार न्यूज नेटवर्क माटरगाव (राजू घाटे):- जिल्हा परिषदेच्या शाळेमधील रिक्त असलेल्या शिक्षक पदावर नियुक्त करावे या व इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथे मोर्चा नेला .या मोर्चानंतर पालकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले .त्यानंतर पालकांसह माटरगाव येथील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी गाव बंद करण्यात आले. सदर गाव बंद यशस्वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचेच नाही अशी भूमिका पालकांनी घेतली.ही माहिती पोलीस सूत्रांना मिळाल्यानंतर आज कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात यांनी शांतता समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांसोबत यशस्वी चर्चा केली .

बैठकीला उपस्थित आमदार आकाश फुंडकर

यावेळी विभागाचेआमदार आकाश दादा फुंडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकरे ,पोलीस निरीक्षक बारापात्रे,यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती झालेला प्रकारचा तपास सुरू राहणार असून पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, त्यामुळे त्यांना नियमित शाळेत पाठवावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात यांनी केले या आव्हानाला नागरिकांनी दुजोरा दिला असून मुलांना दैनंदिन शाळेत पाठविण्याचे मान्य केले .शांतता समितीच्या बैठकीला विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .




Post a Comment

أحدث أقدم