आरपीएफ चे रंजन तेलंग यांनी हरवलेला मोबाईल केला परत
शेगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- रेल्वे स्टेशन शेगाव येथे असलेल्या बुकिंग ऑफिसमध्ये रंजन तेलंग हे गस्त घालत असताना रात्री 3 च्या सुमारास त्यांना एक मोबाईल बेवारस परिस्थितीत सापडून आला एका तासाने त्यावर आलेल्या कॉल वर तेलंग यांनी प्रवाशाला त्यांचा मोबाईल सुरक्षित असल्याचे सांगितले नंतर त्यांनी प्रवाशाला मोबाईल आरपीएफ ठाण्यात येऊन घेऊन जाण्यासाठी सांगितले असता यात्री गजानन ढोरे राहणार बडनेरा हे पोहचले व विवो कंपनी च्या वाय एस फोनची किंमत रु. 12000/- त्यांनी परत केला त्यावेळी गजानन यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता प्रवाशांकडून आरपीएफ विभागाचे व प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांचे आभार मानले .
إرسال تعليق