संतापजनक:

 ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांचा सामूहिक बलात्कार 

खामगाव: बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाण्यात आठ नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच राजूर घाटातून दुपारी जात होती. दरम्यान राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी ते थांबले असता त्यांच्या गळ्याला चाकू लावून आरोपींनी पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरा मागील दरीत नेले. तेथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केल्याचे  पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. पीडित महिला व तिच्या समवेत असलेला व्यक्ती राजूर घाटात देवीच्या मंदिरानजीक सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील ४५ हजार रुपये लुटले. सोबतच महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

Post a Comment

أحدث أقدم