बुलडाणा जिल्हा योगासन स्पोर्ट्स जिल्हा स्तरीय निवड चाचणी स्पर्धा २०२३-२४

खामगांव दि.१७.
       बुलडाणा जिल्हा योगा असोसिएशन, खामगांव यांच्या वतीने महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत बुलडाणा जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आयोजित बुलडाणा जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी ड्रीमकार्ट ऑफिस, डॉ. राजपूत हॉस्पिटल जवळ, सिव्हिल लाईन, खामगांव येथे सकाळी ११.०० वाजता करण्यात आलेले आहे.   स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी २८ जुलै  पर्यंत महाराष्ट्र योगासन स्पोर्ट गुगल फॉर्म लिंकवर  नोंदणी करणे आवश्यक आहे. 

  स्पर्धा खालील चार प्रकारात होतील.
१) ट्रॅडिशनल योगासन स्पर्धा
२) आर्टिस्टिक योगासन सिंगल स्पर्धा
३) आर्टिस्टिक योगासन पेअर स्पर्धा
४) रिदमिक योगासन पेअर स्पर्धा
स्पर्धा मुले व मुलींसाठी स्वतंत्र गटात होतील.
स्पर्धक एक किंवा दोन येगासन प्रकारात सहभाग घेऊ शकतो.
स्पर्धेसाठी खालील प्रकारे वयोगट राहतील.
 9 ते 14 वर्षे,  14 ते 18 वर्षे,18 ते 28 वर्षे  मुले व मुली , 28 ते 35 पुरुष व महिला,35 ते 45 पुरुष व महिला,45 ते 55 पुरुष व महिला.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी पुढील कागदपत्रे सादर करावीत.
 १) आधार कार्डची फोटो कॉपी, २) वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र) ,३) डॉक्टरचे फिटनेस प्रमाणपत्र, ४) पासपोर्ट आकाराचा फोटो ,५) जोखीम प्रमाणपत्र. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा व डॉ.मंगला दळवी, अमरावती हे निरीक्षक राहतील. ज्यांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी फॉर्म भरण्याची लिंक, अभ्यासक्रम, नियम ई.माहितीसाठी जिल्हा समन्वयक डॉ.पी.आर. उपर्वट यांचेशी 9850281150 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त संख्येने मुले,मुली, पुरुष व महिला यांनी सहभाग घेऊन आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी अमर धामणकर, कु.पूजा भोपळे,   विनोद भरसाकळे ,डॉ.वैशाली निकम, डॉ.तृप्ती काटेकर , कल्याण गलांडे, एस.एम.चव्हाण, प्रेमदास वाकोडे यांचेशी संपर्क साधावा.

1 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم