“आजकाल इतके पूर का येतात आधी तर असे नव्हते”

             आपण आतासगळीकडे बातम्यांमध्ये पाहतो आहे की ७५ टक्के भारत हा पूरग्रस्त परिस्थितीने ग्रासलेला आहे आणि ह्या पुरामुळे सगळीकडे हाहाकार माजलेला असून कितीतरी लोकांनी आपले छत्र गमावलेले आहे , कुणाच्या शेतीचा खूप सारे नुकसान झाले आहे . परंतु अशी परिस्थिती का उद्भवत आहे दरवर्षी कुठे ना कुठे आपण ओला दुष्काळ पाहतच आहोत. मग याच्या आधी काय असा पाऊस यायचा नाही का ? आपल्या पूर्वजांच्या काळामध्ये असे पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती का ? तेव्हा असं कधी होत नव्हतं पूर्णच्या पूर्ण गाव वाहून गेलं किंवा शेत वाहून गेलं. हो हे खरंच आहे आधीच्या काळामध्ये कितीही पाऊस पडला तरी अति अशी पूर परिस्थिती निर्माण होत नव्हती किंवा क्वचितच होत होती

               याचा खोलवर अभ्यास करून आपण थोडी कारणमिमांसा करूया. 

              यवतमाळ मध्ये आम्ही गो ग्रीन यवतमाळ ही चळवळ जेव्हा सुरु केली त्या माध्यमातून माझा खूप साऱ्या तज्ञ लोकांशी संपर्क आला आणी त्यांच्यापासून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणी खूप सारे ज्ञान सुद्धा मिळाले अशीच भेट परवा यवतमाळला झाली ती डॉ. सचिन पावडे वर्धा ह्यांची, त्यांनी रेन वाटर हार्वेस्टिंग मध्ये खूप काम केले आहे त्यांच्याशी चर्चा करताना मला बऱ्याच गोष्टी कळाल्या 

               आपल्या भुगर्भात जे पाणी आहे ते दोन पातळी मध्ये विभागल्या गेले आहे. एक वरच्या पातळीचे पाणी जे पावसाचे असतं जे जमिनीत मुरतं पण हे पाणी पन्नास साठ फुटाच्या खाली जात नाही. त्यानंतर तिथे एक खडक असतो ज्याला आपण काळा दगड सुद्धा म्हणतो तो कमी जास्त लेवल ला असू शकतो आणी तो सगळीकडे आहे, त्याच्या खाली सुद्धा एक पाण्याचा मोठा साठा आहे ज्याला आपण खालची पातळी म्हणू , जो पृथीचा अविभाज्य अंग असून त्याचे सुद्धा मोठे मोठे प्रवाह आहेत आणी त्याला एक विशिष्ट प्रेशर् सुद्धा आहे. असे समजा की ती पृथ्वीची रक्ताभिसरण संस्था आहे एक एक प्रवाह म्हणजे तिची नस आहे म्हणजेच त्याच्यात पृथ्वीचा जीव आहे आणी तो काळा दगड म्हणजे त्याचे कवच आहे.

              आता जुन्या जमान्यात काय होते की सगळीकडे विहिरी होत्या आणी विहिरीचे पाणी सगळे वापरायचे त्यांची खोली सुद्धा विस तीस फुट जास्तीत जास्त पन्नास साठ फुट इतकी असायची. 

ह्याचा अर्थ असा की आपण जे पाणी वापरायचो ते पाणी वरच्या पातळीचे पावसाचे जिरलेले असायचे आणी त्या काळात नाल्या सुद्धा नव्हत्या म्हणून सगळ्यांच्या घरी मोरी म्हणजे एक शोषखड्डा असायचा तिथे घरातले वापरणीचे पाणी मुरायचे हेच पावसाचे आणी वापरणीचे पाणी आपल्या विहिरित् येऊन ते परत आपण वापरायचो. म्हणजेच सगळा समतोल साधला जायचा आणी आजही खेड्यामध्ये बहुतांशी हेच चित्र आहे. 

          नंतर जमाना बदलला आणी आधुनिकीकरण आणी शहरीकरण व्हायला लागले 

माग काय झाले बोअर चा जमाना आला आपण जिथे पाणी नाही लागले तिथे शंभर दोनशे तीनशे फुट बोअर करायला लागलो आणी तो काळा दगड म्हणजेच कवच फोडून आतमधले पाणी बाहेर काढून वापरायला लागलो म्हणजेच तिची नस फोडून त्यातले रक्त काढायला लागलो आणी ते वापरायला लागलो त्याला एक प्रेशर असते ज्यामुळे पृथ्वीचा भुगर्भ सुरक्षित राहतो म्हणूनच आपण कधी कधी बोअर केले की मोठा फवारा हवेत उडतो आता सगळ्या घरात नळ फिटिंग झाली सगळीकडे नाल्या आल्या ज्यामध्ये वापरणीचे पाणी सोडायला लागलो आणी जुने लोक प्रातःविधिकारिता शेतात जायचे एक लोटा पाण्यात व्हायचे आता फ्लश आला संडास आले त्यात पाण्याची नासाडी व्हायला लागली अशी नासाडी सगळ्या गोष्टीत व्हायला लागली आणी ते सगळे पाणी नालीतून वाहायला लागले 

                मग् ह्यामुळे काय झाले की आपण पृथ्वीचा भुगर्भातील पाणी खोलवर असलेले पाणी बाहेर तर काढले पण त्या पाण्याची रिप्लेसमेंट केली नाही कारण आपले पाणी नाल्यात गेले आणी माग नदीत आणी शेवटी समुद्रात गेले आणी जे मुरले ते पन्नास साठ फुटापर्यंत च गेले त्यामुळे भुगर्भातील खोलवर असलेले पाणी आपण संपवित आहोत आणी त्याचा परिणाम म्हणून् पृथ्वीवरील पाण्याची पातळी वाढत आहे समुद्राची पातळी वाढत आहे. 

                दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण जे प्रदूषण करतो आहे त्या प्रदूषणामुळे ग्लोबल टेंपरेचर वाढत आहे आणि मोठे मोठे हिमनग वितळत आहे त्यामुळे सुद्धा पाण्याची पातळी वाढत आहे. 

                आणी ह्या वाढलेल्या पातळीचा परिणाम म्हणून् आपण आज ह्या भयाण पूरपरिस्थितीचा सामना करित आहे, दिवसेंदिवस हा प्रकोप वाढतच जाणार आहे आणी ह्याच्यावर जर योग्य वेळी पाऊल उचलले गेले नाही तर हळूहळू पृथ्वी नश्वरतेकडे जाणार आहे.

 मग आता काय करायला पाहिजे. आपण ह्या गोष्टी टाळण्याकरिता खालील उपाय करू शकतो 

 1. अंगणात छोटीशी का होईना विहीर बनवावी बोअर करणे टाळावे आणी हे सहज शक्य आहे त्यावर कव्हर टाकून आपण ती जागा वापरू शकतो 2. बोअर करायची असल्यास् जास्त खोल करू नये 3. सगळ्यात महत्वचे म्हणजे रेन वाटर हार्वेस्टिंग . प्रत्येक घरात रेन वाटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे पावसाचे पाणी व वापरणीचे पाणी नालीत ना जाऊ देता तिथेच मूरवायला पाहिजे म्हणजे पाण्याची पातळी वाढेल. 4 आपल्याकडे खूप खोल अशी बोअर असेल तर रेन वाटर हार्वेस्टिंग चे पाणी आपण एक विशिष्ट फिल्टर वापरून ( डॉ. सचिन पावडे वर्धा ह्यांच्याकडे ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध आहे ) ते बोअरमध्ये सोडायला पाहिजे म्हणजे भुगर्भातीत खोलवरच्या पाण्याची पातळी वाढेल आणी आपण जिथले पाणी वापरले ते तिथेच परत जाईल.5. गो ग्रीन संघटनेचा मुख्य उद्देश की जास्तीत जास्त मोठी झाडे म्हणजे वृक्ष लावायला पाहिजे ज्यांची मूळं जमिनीत पाणी धरून ठेवतात आणी पातळी राखण्यास मदत करतात सोबतच त्यांचे इतर खूप फायदे आहे. 6. जिथे शक्य होईल तिथे गाडीचा वापर टाळावा म्हणजे प्रदूषण कमी होईल. 

             आपण मनाशी संकल्प केला तर ह्या सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो स्वतःपुरता विचार ना करता आपल्या भावी पिढ्यांचा विचार केला तर पृथ्वीला नश्वरतेकडे जाण्यापासून वाचवू शकतो.

लेखक - डॉ. स्वप्नील मानकर
यवतमाळ
9850330301
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Post a Comment

أحدث أقدم