आ अँड फुंडकर यांच्यामुळे महाराष्ट्रातील गोर गरीब विद्यार्थांच्या आशा झाल्या पल्लवित; आ अँड फुंडकरांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील समस्सेबाबत विधानसभेचे वेधले लक्ष
खामगाव::-आ अँड आकाश फुंडकरांनी आज खामगावसह राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील समसेबाबत विधानसभा सभागृहात राज्य सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आज आ अँड आकाश फुंडकर यांनी आज मागासवर्गीय वसतिगृहातील समस्येबाबत विधानसभा सभागृहात तरांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी आ अँड फुंडकर यांनी खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना निकृष्ट जेवण व फळे तसेच अस्वच्छ पाणी दिले जाते. वसतिगहात स्वच्छतेचा अभाव आहे. अश्या विविध समस्या आहेत याबाबत विद्यार्थिनींनी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन सुध्दा केले होते. त्यावेळी चौकशीत तेथे खरंच समस्या असल्याचे आढळून आले. तसेच हे वसतिगृह भाड्याच्या जागेत आहे आणि त्या इमारतीच्या मालकाला दोन वर्षापासून भाड्याची रक्कम शासनाकडून मिळालेली नाही. शासकीय अश्या वसतिगृहाची ही समस्या केवळ खामगाव मध्येच नाही तर संपर्ण महाराष्ट्रात आहे. येथील सुविधे कडे लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय कोणतीही समिती नाही. त्यामुळे यासाठी एक समिती प्रत्येक जिल्हास्तरीय निर्माण करावी अशी मागणी केली. तसेच खामगाव मधील सर्व शासकीय वसतिगृहे ही कोविड काळात रुग्णसेवे साठी वापरली केली, त्यामुळे ईमारती चे तसेच तेथील समानांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी सुध्दा शासनाने मदत द्यावी. बुलडाणा जल्ह्यातील वसतिगहातील आठ गृहपालांच्या जागा रिक्त आहेत त्यासुध्छा तातडीने भराव्यात, गृहापलांवर कारवाई करून काही होणार नाही सरकारने वसतिगृहातील समस्या काय सोडविण्यात येथील तेथे चांगली व्यवस्था कशी उभारू शकेल यासाठी प्रयत्न करावे असे मतसुध्छा आ अँड आकाश फुंडकर यांनी यावेळी मांडले. याला उत्तर देताना मंत्री ना शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना सांगितले की आ अँड फुंडकर यांनी जी वस्तुस्थिती मांडली ही खरी असल्याचे मान्य केले. खामगाव सह राज्यातील वसतिगृहातील समस्या सोडिण्यासाठी उपाययोजना केल्या जातील , थकीत भाडे तातडीने दिल्या जाईल आणि प्रत्येक जिल्हास्तावर लोकप्रिनिधींनीच्या समावेश करून देखरेख समिती निर्माण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी विधानसभा सभागृहात दिली. आ अँड आकाश फुंडकर यांच्या या तरांकीत प्रश्नांमुळे आणि त्यावर मंत्री ना शंभूराज देसाई यांनी सकारात्मक उत्तर दिल्याने केवळ खामगाव, बुलडाणा जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय वसतिगृहात येणाऱ्या दिवसात चांगल्या सोयी सुविधा मिळतील अश्या आशा ह्या वसतिगृहात राहणाऱ्या हजारो गोर गरीब विद्यार्थ्यांना पल्लवित निर्माण झाल्या आहेत.
إرسال تعليق