ग्राहक सेवा केंद्र चालकास रस्त्यात अडवून लुटले
पिता-पुत्राला मारहाण करुन लॅपटॉप व ९५ हजार लंपास
खामगाव-लुटमार व चोऱ्यांचे प्रकारसुरुच असून काल रात्री दरम्यान दुचाकीनेघरी जाणाऱ्या ग्राहक सेवा केंद्र चालकपिता--पुत्रास दोन चोरट्यांनी चाटेत अडवूनपैसे व लॅपटॉप लंपास केल्याची घटनाअंबोडा रोडवरील मिलीटरी कॅम्पसमोरघडली.
अंबोडा येथील सोहम सुरेश जामोदे (२६) याचे नांदुरा येथे ग्राहकसेवा केंद्र असून काल रात्री ग्राहक सेवा केंद्राचे काम आटोपून सोहम वत्याचे वडील सुरेश जामोदे हे दोघे दुचाकी क्र. एमएच २८बीपी ५०२५ नेघरी निघाले होते. दरम्यान अंबोडा रोडवरील मिलिटरी कॅम्पसमोर दोनअज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडविली व काठीने मारहाण करुनजामोदे यांच्याजवळील लॅपटॉप व ९५ हजाराची रोख रक्कम हिसकावूननेली. यात जामोदे पिता-पुत्र जखमी झाले असून याबाबत सोहन जामोदेयाने जलंब पोस्टेला तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी दोन अज्ञातइसमांविरुध्द कलम ३९४,३४ भादंबीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
إرسال تعليق