मुक्तांगण फाऊंडेशन शेगाव मार्गावर स्वच्छता अभियान राबविणार..


जनोपचार न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील मुक्तांगण फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २४ जुलै रोजी पहाटे ४ वाजतापासून श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात खामगाव - शेगाव मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांची पालखी २३ जुलै रोजी खामगावात दाखल होणार आहे, तर २४ जुलै रोजी पालखी सोहळा शेगावकडे मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोबत खामगाव, बुलढाणा, चिखली, मेहकर, जळगांव जामोद, नांदुरा येथील भाविक पायी वारी करतात. तसेच ठिकठिकाणी वारीत सहभागी भक्तांना महाप्रसाद, चहा, नाश्ता, फराळाची व्यवस्था करण्यात येते. पालखी मार्गावर कचरा जमा होतो, हा कचरा दरवर्षी मुक्तांगण फाऊंडेशन स्वच्छ करते. २४ जुलै रोजी मुक्तांगणच्या वतीने १८ किलो मीटरच्या दिंडी मार्गावर पहाटे ४ वाजतापासून स्वच्छता करण्यात येणार आहे. पहाटे मुक्तांगणची चमू पालखी मार्गावर हजर राहणार आहे. पालखी मार्गावर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुक्तांगणचे शेकडो सदस्य या स्वछता अभियानात सहभागी होणार आहे. या उपक्रमात चिन्मय विद्यालय शेगाव येथील १४० विद्यार्थी व् शिक्षक सहभागी होणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم