सिल्वरसिटी मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा
खामगाव :- सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटर येथे दि १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंच्यावर सिल्वरसिटी हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन, संचालक डॉ निलेश तिबडेवाल, डॉ भगतसिंग राजपूत, डॉ गौरव गोयंका, भागधारक डॉ संजीव नारखेडे, डॉ गुरुप्रसाद थेटे, डॉ गिरीश पवार, डॉ अनुप शंकरवार, सत्कार मूर्ती डॉ अनील शंकरवार यांची सहपरिवार उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते द्विप प्रज्वलन व धंवन्तरी पुजानाने करण्यात आली. उप मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ गौरव लढढा यांनी प्रस्तविक केले. डॉ डे चे औचित्य साधून सिल्वरसिटी हॉस्पिटल खामगाव येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ अनिल शंकरवार यांचा शाल, श्रीफळ, हार व सिल्वरसिटी जीवनगौरव पुरस्कार स्मृती चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर व इतर सर्व मान्यवराचे हस्ते करण्यात आला. सत्कार मूर्ती चा परिचय डॉ पंकज मंत्री यांनी दिला. तदनंतर हॉस्पिटल चे सर्व संचालक वृंद, भाग धारक डाक्टर्स, हॉस्पिटल मध्ये कार्यरत सर्व डॉक्टर्स यांचा गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन डॉक्टर्स डे निमित्त सत्कार करण्यात आला.. सत्कारास उत्तर देतांना डॉ अनिल शंकरवार यांनी आपल्या खडतर प्रवासची माहिती दिली व सिल्वरसिटी हॉस्पिटल ने दिलेल्या पुरस्काराने भारावून गेल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ अशोक बावस्कर यांनी डॉक्टर्स डे चे महत्व व भारतरत्न डॉ भिधान चंद्र रे यांच्या बद्दल माहिती दिली..
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन यांन्नी उपस्थितीतांचे आभार मानले. या कार्यक्रमा सोबतच हॉस्पिटल मधील एम्पलोयीज ऑफ द मंथ चा अवॉर्ड देखील हॉस्पिटलच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या हॉस्पिटलच्या एम्पलोयींना एम्पलोयी ऑफ द मंथचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचलन उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गौरव लढढा यांनी केले. या कार्यक्रमांस डॉ परीक्षित मानकर, डॉ मेंढे, डॉ आयन हुसेन, डॉ निदा हुसेन व इतर सर्व डॉक्टर्स मंडळीची सहकुटुंब उपस्थिती होती तसेच हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल चे व्यवस्थापक श्री निलेश बैरागी, सुपरवाईजर श्री राजेश साटोटे, सुपरवाईजर यश देशमुख, रिसेप्शनिस्ट जया इंगळे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे..
إرسال تعليق