किन्ही महादेव गावकऱ्यांना नवीन डीपी मिळाल्यामुळे वारंवार येणाऱ्या विजेच्या समस्या दूर
किन्ही महादेव:-(अनंता तोडेकर) येथील गावकऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून वीज जोडणी एकाच डीपी वरून असल्यामुळे गावामध्ये अनेक दिवसांपासून ग्रामस्थांचा वारंवार विज पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याच समस्येची दखल घेत वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे व ग्रा.पं. सदस्य हरिदास गव्हाणे, सागर रणित तसेच वैभव काकड, अनंता तोडेकर, आकाश चतारकर, संजय तिव्हाणे, सचिन दांदडे,आशिष आप्पा कठाळकर, भानुदास लांडे, भागवत ठाकरे, योगेश धानोरे,भरत आराख, प्रविण मोरे,राजु दांडगे, मंगेश पारस्कार, निवृत्ती इंगळे, आकाश इंगळे, अमोल इंगळे इत्यादींनी दिलेल्या तक्रारीवरीची दखल घेत महावितरण कर्मचारी महादेव हळम यांनी किन्ही महादेव गावकऱ्यांना नवीन डीपी मिळवून दिली.
إرسال تعليق