खामगाव सामान्य रूग्णालयास म.ज्योतीराव फुलेेंचे नाव देण्यात यावे -आ.अॅड. फुंडकरांची विधानसभेत आग्रही मागणी
खामगाव (का.प्र.)- खामगाव सामान्य रूग्णालयास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुलेंचे नाव द्यावे, ही मागणी पावसाळी अधिवेशनात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत मा.सभापती महोदय यांचेकडे केली आहे. त्यामुळे महात्मा ज्योतीराव फुलेंचे नाव खामगाव सामान्य रूग्णालयास देण्याबाबत विधानसभेत मुद्दा चर्चीला गेला आहे. याबाबत विधान सभा व मंत्री मंडळात ठराव देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे खामगाव उपजिल्हा रूग्णालयास महात्मा ज्योतीराव फुले यांचे नाव देण्याच्या मागणीबाबत आता ठोस पावले उचलली जात आहे. येत्या काळात महात्मा ज्योतीराव फुलेंचे कायमस्वरूपी नाव उपजिल्हा रूग्णाल्यास दिले जाईल यात शंका नाही.
![]() |
Advt. |
माळी समाज बांधवांच्या मागणीला यश - गेल्या अनेक वर्षापासून माळी समाज बांधव व विविध संघटनांच्या वतीने खामगाव सामान्य रूग्णालयास महात्मा ज्योतीराव फुले नाव देण्याची मागणी अनेकवेळा करण्यात येत होती. या अनुषंगाने आ.अॅड.फुंडकर यांनी प्रशासकीय स्तरावरून ही मागणी रेटून धरली होती. मात्र कोणत्याही रूग्णालयास किंवा प्रशासकीय इमारतीस नाव देतांना मंत्री मंडळात ठराव सर्वानुमते मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतरच संबधीत नाव सदर ठिकाणी देता येतो. त्यामुळे पावसाळी अधिवेशना दरम्यान सामाजिक कार्यकर्ते उल्हास वानखडे, योगेश हजारे व दत्ताभाऊ जवळकार, विजय उगले यांनी दि.23जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजता आ.अॅड.फुंडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व विधानसभेत ही मागणी घेण्याची विनंती आ. अॅड. फुंडकर यांचेकडे केली. आ. फुंडकर यांनी लगेच ‘हो’ म्हटले व मुंबई येेेथे अधिवेशना दरम्यान सभापती महोदयांसमोर ही मागणी रेटून धरली. त्यामुळे म.फुुलेंचे नाव खामगाव सामान्य रूग्णालयास देण्याबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे माळी समाज बांधवांनी आ.अॅड.फुंडकर यांचे आभार व्यक्त केले आहे.
إرسال تعليق