उद्या श्रींची पालखी खामगावात तर 24 रोजी शेगाव

 पावसाची स्थिती पाहून नागरिकांनी परतीच्या वारीत सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि 22 : श्री संत गजानन महाराज यांची परतीची वारी सोमवार, दि. २४ जुलै रोजी खामगाववरून शेगावला परतणार आहे. या परतीच्या वारीत भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. मात्र यावर्षीची पावसाची परिस्थिती पाहून नागरिकांनी परतीच्या वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.


श्री संत गजानन महाराज यांच्या परतीच्या वारीचे आगमन झाले आहे. ही वारी खामगाव येथे दि. 23 जुलै रोजी मुक्कामी राहणार असून सोमवार दि. 24 जुलै रोजी खामगाववरून शेगावला परतणार आहे. या दोन्ही दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर सोहळ्याला उपस्थित असतात. मात्र यावर्षी सर्वत्र पावसाची स्थिती आहे. यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. परतीच्या वारीच्या दिवशी वातावरणाचा अंदाज पाहून नागरिकांनी परतीच्या पालखीत सहभागी व्हावे, तसेच पावसाची परिस्थिती असल्यास नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परतीच्या वारीत सहभागी होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم