अवकाळी पावसात मृत्युमुखी पडलेल्या युवक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आ अँड फुंडकरांच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश प्रदान
खामगाव ::-अवकाळी पावसात झाड अंगावर पडून मृत्यू युवक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आ अँड आकाश फुंडकर यांनी 4 लाख रुपये मदतीचा धनादेश आज 22 जुन रोजी प्रदान करण्यात आला.
खामगाव तालुक्यात 4 जून रोजी अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी गेरू माटरगाव येथील युवक शेतकरी किशोर ज्ञानेश्वर खोडके यांचे अंगावर झाडाची मोठी फांदी पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आज आ अँड आकाश फुंडकर यांनी खोडके कुटुंबियांचे सांत्वन केले. व त्यांचे वडिलांना शासनच्या वतीने 4 लक्ष रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे उपस्थित होते.
إرسال تعليق